एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी व्यवहार भारताने करू नये ; अमेरिकेची पुन्हा धमकी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या भारत सैन्याच्या बाबतीत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. तसंच भारत आपल्या ताकदीत दिवसेंदिवस वाढ करत आहे. सध्या भारत रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर अमेरिका हा व्यवहार रोखू पाहत आहे. भारत रशियाने हा व्यवहार करून नये यासाठी अमेरिका भारतावर धमकी देत दबाव आणत आहे.

भारताचा हा निर्णय दीर्घ कालावाधीसाठी भारताच्या हिताचा नसेल. तसेच या व्यवहारामुळे दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीवरही याचा परिणाम होऊ शकतो, अशी धमकी अमेरिकेकडून देण्यात येत आहे. दक्षिण आशियाई देशांनी कोणाकडून संरक्षण सामग्री खरेदी करावी, याचा निर्णय त्याच देशांनी घ्यावा. करारांनुसार भारताने अमेरिकेकडून अधिक संरक्षण सामग्री खरेदी करणे आवश्यक आहे. परंतु भारत रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करत आहे, असं अमेरिकेचे सहयोगी परराष्ट्रमंत्री अलायस वेल्स यांनी सांगितले.

ट्रम्प सरकार भारताच्या संरक्षण व्यवहारात मदत करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. संरक्षण व्यवहारात अमेरिका भारताचा सर्वात मोठा सहकारी आहे. रशिया आणि भारतात सुरू असलेल्या व्यवहाराचा परिणाम दोन्ही देशांच्या परस्पर सहकार्यावर होईल, अशी धमकी वजा इशारा वेल्स यांनी दिला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चेनंतर भारत आणि रशियामध्ये ५ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. यात एस-४०० क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा समावेश आहे. मात्र अमेरिकेने भारताला एस-४०० ऐवजी पॅट्रियॉट -३ या क्षेपणास्त्राची खरेदी करण्याची ऑफर दिली होती. अमेरिका भारताला हाय अल्टीट्यूड एरिया डिफेन्स आणि पेट्रियॉट-३ ची विक्री करू इच्छीत असल्याचे संकेतही यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने दिले होते. मात्र मोदींनी ते न स्वीकारता रशियाशी करार करण्याचे ठरवले. त्यामुळे अमेरिका हा व्यवहार न होण्यासाठी भारतावर दबाव आणत आहे.

दरम्यान,  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांच्या भारत दौऱ्यापूर्वी ओसाका येथील जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या भूमिकेवर काय होतेय हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

‘इन्सेफेलाईटीस’चे थैमान, बिहारमध्ये ६६ मुलांचा मृत्यू

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Loading...
You might also like