भारताविरूध्द ‘कारवाई’ तर सोडाच पण ‘ढूंकुन’ देखील पाहू नका, अमेरिकेचा पाकिस्तानला ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर खडे बोल सुनावले आहेत. त्याचबरोबर गंभीर इशारा देखील दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे कि, भारताविरुद्ध केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये घट त्याचबरोबर त्यांच्यावर लगाम लागली नाही तर पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तान मागील काही वर्षांपासून सीमेवरून सतत गोळीबाराचे उल्लंघन करत असून दहशतवाद्यांना मदत देखील केली जाते.

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानने काल संसदेचे जॉईंट सेशन बोलावले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ करण्यात आला. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान बावचळला असून जगभरातील अनेक देशांकडे काश्मीरप्रश्नी मदत मागत आहे. मात्र त्यांना कुणीही मदत करण्यास तयार नाही. त्यानंतर आता अमेरिकेने हा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणीत वाद झाल्याचे दिसून येत आहे.

Kashmir

ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने पाकिस्तानला ब्लॅकलिस्टेड करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने सांगितले आहे कि, जर पाकिस्तानने दहशहतवाद्यांना मदत करण्याचे थांबवले नाही तर त्यांना फायनेंशियल एक्शन टास्क फोर्स मधून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. पाकिस्तान मागील वर्षी जूनपासून या संस्थेच्या ग्रे सूची मध्ये असून त्यांनी हि कारवाई थांबवली नाही तर लवकरच ते ब्लॅकलिस्टेड होणार आहेत.

दरम्यान, अमेरिकेने पाकिस्तानला त्यांचा जिहादी नेता राउफ अजगर आणि लष्कराच्या नेत्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त