‘कोरोना’ रोखण्यासाठी ट्रम्प घेत असलेल्या औषधांची चाचणी करणं अधिक चांगलं : WHO

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मलेरियाच्या उपचारात वापरली जाणारी औषधे म्हणजेच हायड्रॉक्सी क्लोरोक्विन घेत आहेत, या औषधाच्या परिणामांबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट वैज्ञानिक पुरावे सापडलेले नाहीत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ते मर्यादित उपचार चाचण्यांद्वारे कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी औषधाचा वापर करण्याची शिफारस करतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आपत्कालीन सेवा प्रमुख डॉ. मायकेल रायन म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी ज्या औषधे किंवा पद्धतींची आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचणी होत आहेत. त्यापैकी हायड्रॉक्सी क्लोरोक्विन एक आहे. हे औषध कोरोना विषाणूंविरूद्ध प्रभावीपणे कार्य करते की नाही हे अद्याप निश्चित केले जात आहे. डब्ल्यूएचओकडून करण्यात आलेल्या या विधानावरून स्पष्ट होते कि, कोरोना साथीच्या संदर्भात ट्रम्प यांच्याकडून वारंवार होणार्‍या टीकेपुढे तो झुकणार नाही.

ट्रम्प घेत असलेल्या औषधांची पहिली चाचणी करणे चांगले असल्याचे रायन म्हणाले. तसेच, त्यांनी असेही म्हटले आहे की, देशांना त्यांची स्वतःची पसंती किंवा नापसंती असू शकते. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले होते की, आपण हायड्रोक्सी क्लोरोक्विन घेत आहोत. हायड्रोक्सी क्लोरोक्विनचा त्यांचा डोस एक किंवा दोन दिवसात संपेल. हे असे औषध आहे जे 65 वर्षांपासून ल्युपस, संधिवात आणि मलेरियाच्या उपचारांमध्ये उपयुक्त आहे. मात्र त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अलीकडेच, चीनमधील रूग्णांवर उपचार करणाऱ्या एका भारतीय डॉक्टरांनी उघडकीस आणले आहे की, कोरोना रूग्णांवर झिंक, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि एंडोबायोटिक औषध अ‍ॅझिथ्रोमाइसिन यांच्या संयोजनाने उपचार केले जात आहेत. शांघायमधील सेंट मायकेल हॉस्पिटलमधील अंतर्गत औषधांचे डॉक्टर संजीव चौबे यांच्या म्हणण्यानुसार, चीनमधील बहुतेक रुग्णांना झिंक, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि अ‍ॅझिथ्रोमाइसिन एकत्रितपणे दिले गेले जे त्वरीत बरे झाले आणि त्यांना व्हेंटिलेटरची देखील गरज भासली नाही.