COVID-19 : सगळा जनुकांचा खेळ ! जाणून घ्या मोठ्यांच्या तुलनेत छोट्या मुलांवर कमी परिणाम का होतोय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत वृद्ध आणि मुलांवर कोरोनाचा धोका जास्त असल्याचे सांगितले जात होते आणि यांच्या तुलनेत वयस्कांना अधिक सुरक्षित मानले जात होते. डॉक्टर आणि इतर संशोधनात रोग प्रतिकारशक्ती महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. पण एका नवीन संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, आपल्या नाकात एक विशेष जनुक असते, जे या प्राणघातक विषाणूला आकर्षित करण्यात मोठी भूमिका बजावते. मात्र मानवी शरीरात हे जनुक वयानुसार वाढते, म्हणून मुलांना कोविड-१९ चा धोका कमी आहे.

हे जनुक आहे जबाबदार
अभ्यासात संशोधकांनी सांगितले की, नाकातील ACE2 जनुक पहिली संवेदनशील जागा आहे जिथे व्हायरस पहिले हल्ला करतो आणि मानवी शरीराच्या संपर्कात येतो. SARS-CoV-2 व्हायरस ACE2 द्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो. अमेरिकेतील माउंट सिनाईच्या आयकाहन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनुसार, नाकातील ACE2 जनुकाचा बायोमार्कर म्हणून वापर करून कोविड-१९ चा अभ्यास केला जाऊ शकतो.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असते
महिलांच्या तुलनेत हे जनुक ACE-2 (एंजियोटिनसिन कन्व्हर्टींग एन्झाइम-2) प्रथिने पुरुषांमध्ये जास्त आढळते. हे प्रथिने किडनी, फुफ्फुस, हृदय इ. भागांना बनवणाऱ्या ऊतींच्या ग्लायकोप्रोटीनशी संबंधित असतात. ACE-2 रिसेप्टर्स एक प्रकारचे एंझाइम आहे, जे माणसाच्या शरीराच्या हृदय, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड आणि आतड्यांमध्ये सेल्सच्या पृष्ठभागाशी जोडलेले असते. हे रिसेप्टर गंभीर श्वसन सिंड्रोमचे कारण बनणाऱ्या कोरोना विषाणूसाठी कार्यशील आणि प्रभावी असते. हेच कोरोना व्हायरस होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. जामा या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हेल्थ सिस्टीममध्ये ४ ते ६० वर्षे वयोगटातील ३०५ रुग्णांवर हे संशोधन केले गेले. ज्यात असे दिसून आले की, अनुनासिक एपिथिलअममध्ये उपस्थित ACE2 जनुक मुलांमध्ये कमी असतात आणि ते वयानुसार वाढतात. यामुळे हे स्पष्ट झाले की, मुलांना या आजाराचा धोका कमी आहे.