दाऊदला पकडण्यासाठी आता अमेरिका करणार मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दाऊदला शोधण्यासाठी भारताला सहकार्य करण्याबाबत अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. दोन्ही देश दाऊद विरोधात सर्च ऑपरेशन सुरू करणार आहेत. त्यामुळे दाऊदला जेरबंद करण्यासाठी आता भारताला अमेरिकेची साथ मिळाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या २+२ चर्चेत अमेरिकेने ही सहमती दर्शवली. सध्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपला आहे. मात्र पाकिस्तान वारंवार दाऊद तेथे नसल्याचे सांगत आहे.

[amazon_link asins=’B07D9G1GHB,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5abb5dc-b255-11e8-be25-b32a18def326′]

अमेरिकेने दाऊद विरोधात सर्च ऑपरेशन करण्यासाठी भारताची साथ देण्याचे मान्य केल्याने दाऊदच्या कधीही मुसक्या आवळल्या जाऊ शकतात. भारतीय तपास यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून कुख्यात अंडरवल्र्ड डॉन दाऊदच्या शोधात आहेत. त्यांना आता अमेरिकेची मदत मिळणार आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यात भारताला यश येऊ शकते. दोन्ही पक्षांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात डी कंपनी आणि संबंधित दहशतवादी संघटनांविरोधात २०१७ मध्ये सुरू झालेल्या द्विपक्षीय चर्चेचाही उल्लेखही करण्यात आला आहे. डी कंपनीत असलेल्या सूत्रांच्या जीवाला धोका असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दाऊदची माहिती जाहीर करणे भारतासाठी आव्हानात्मक होते. आता अमेरिकेने दाऊदविरोधात भारताची साथ देण्याचे ठरवल्याने दाऊदबाबतची सगळी माहिती अमेरिकेला दिली जाऊ शकणार आहे.

जाहीरात 

१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊदचा प्रमुख सहभाग आहे. २००३ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. भारतासोबत अमेरिकेसाठीही दाऊद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. अमेरिकेने दाऊदवर २५ लाख डॉलर्सचे बक्षीसही लावले आहे. भारताने केलेल्या प्रयत्नांमुळेच युएई आणि ब्रिटनमधील त्याच्या संपत्तीवर टाच आणणे शक्य झाले आहे.