धक्‍कादायक ! ‘Tinder’ च्या माध्यमातून युवती गेली डेट करायला मात्र मिळाला तिचा १४ तुकडे झालेला मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील नेब्रास्का मध्ये हत्येची एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे आणि यात एका मुलीची टिंडरमुळे हत्या करण्यात आली आहे. एक मुलगी ऑनलाइन डेटींग अॅप टिंडरच्या माध्यमातून डेट वर गेली होती. परंतू नंतर तीचे १४ तुकडे करण्यात आलेला मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी आरोपीने न्यायालयात एक वेगळीच बाब सांगितली. त्याने सांगितले की सहमतीने रफ सेक्स करताना ही दुर्घटना घडली आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला.

ही घटना नेब्रास्काच्या ओमाहा भागात घडली. डिसेंबर २०१७ मध्ये २४ वर्षीय सिडनी लूफे हीचा मृतदेह सापडला. टिंडर डेटला गेल्याच्या एक महिन्यानंतर लूफेच्या हत्येचा खुलासा झाला. पोलिसांना या प्रकरणी ५२ वर्षीय औब्रे ट्रेल आणि त्यांची मैत्रीण यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची सुनवाई न्यायालयात झाली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. ट्रेल दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनवण्यात आली आहे.

अशी झाली हत्या –
आरोपीच्या वकीलाने न्यायालयात सांगितले की महिलेचा मृत्यू सहमतीने रफ सेक्स करताना झाला. त्याने सांगितले की महिला आणि आरोपी सेक्स करताना ही दुर्घटना घडली. वकीलाने महिलेच्या शरीरावर मिळालेल्या व्रणांबाबत देखील सांगितले.

टिंडरच्या माध्यमातून फसवल्याचा आरोप –
प्रॉसेक्युटरने सांगितले की, मुद्दामून महिलेला Tinder च्या माध्यमातून फसवण्यात आले आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्यांनी असेही सांगितले की डेटवर जाण्याआधी आरोपीची मैत्रीण सिडनी लूफे यांना भेटली होती. सध्या या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सावधान ! सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ आजार

जाणून घ्या : ‘कडुलिंबाच्या’ पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे

स्किनच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्वरित परिणाम देणारी ‘कॉफी’

‘डिमेन्शिया’ रुग्णांची काळजी कशी घ्यावी