US : 6 दशकांत प्रथमच महिलेला सुनावण्यात आली मृत्यूदंडाची शिक्षा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेत, गर्भवतीचा गळा आवळून हत्या करुन आणि नंतर गर्भ फाडून मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सहा दशकांत प्रथमच महिलेला शिक्षा सुनावण्यात आली आहे. लिसा मान्टगोमरीला 8 डिसेंबर रोजी विषाचे इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. सुमारे 20 वर्ष रखडवल्यानंतर यावर्षी जुलैमध्ये पुन्हा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लिसा ही नववी संघीय कैदी असेल जिला ही शिक्षा दिली जाईल.

मान्टगोमरीला 23 वर्षीय बॉबी जो स्टिननेटच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. डिसेंबर 2004 च्या हत्याकांडाबद्दल, वकीलाचे म्हणणे आहे की, कुत्र्याच्या पिल्लाला दत्तक घेण्याच्या नावाखाली मान्टगोमरी कंसास स्थित तिच्या घरापासून स्टेननेटच्या घरी गेली होती. घरी पोहोचल्यावर मान्टगोमरीने दोरीने स्टेननेटचा गळा दाबला आणि आठ महिन्यांच्या गर्भवती स्टेननेटचे पोट फाडून मुलाला बाहेर काढले आणि ती फरार झाली. न्यायाधीशाने मान्टगोमरीच्या वकिलाच्या त्या तर्काला फेटाळले ज्यामध्ये ती आजारी असल्याचे सांगितले गेले होते.