‘कोरोना’ला मात देणार्‍यांमध्ये सुद्धा 3 महीन्यांपर्यंत कायम राहाते ‘इम्यूनिटी’ : स्टडी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात प्रकोप चालवला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर या व्हायरसवर सतत संशोधन करत आहेत. आता अमेरिकन हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) ने आपल्या नागरिकांसाठी कोरोना व्हायरस बाबत नवीन अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांच्यामध्ये तीन महिन्यापर्यंत इम्यूनिटी म्हणजे व्हायरसशी लढण्याची क्षमता कायम राहते.

तीन महिने क्वारंटाइन होण्याची गरज नाही
अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले आहे की, या अ‍ॅडव्हायजरीचा अर्थ हा आहे की, कोरोनावर मात करणारे लोक तीन महिन्यापर्यंत दुसर्‍यांसोबत राहू शकतात. सीडीसीच्या वेबसाइटवरील अ‍ॅडव्हायजरीमध्ये लिहिले आहे की, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, ते बरे झाल्यानंतर त्यांनी पुढील तीन महिन्यांपर्यत स्वताला वेगळे ठेवण्याची गरज नाही, जोपर्यंत त्यांना व्हायरसची लक्षणे दिसत नाहीत. जर कुणामध्ये सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्याचा त्रास, अशी लक्षणे दिसून आली तर तपासणी करू घ्या.

दुसर्‍यांदा संसर्गाचा धोका!
कोरोना व्हायरस अतिशय धोकादायक आहे. अनेकदा असे आढळून आले आहे की, रूग्ण या व्हायरसने दुसर्‍यांदा संक्रमित झाले आहेत. सामान्यपणे एखाद्या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर लोकांमध्ये त्याची इम्यूनिटी मोठ्या कालावधीपर्यंत कायम राहाते. परंतु, या व्हायरसमध्ये आढळले आहे की, अनेकदा काही आठवड्यानंतर रूग्णाची इम्यूनिटी कमी होते. त्यांना दुसर्‍यांदा धोका निर्माण होतो. सुमारे 9 महिन्यांपूर्वी या व्हायरसने जगभरात शिरकाव केला होता. अशा स्थितति संशोधक जाणून घेत आहेत की, अखेर केव्हापर्यंत लोकांना दुसर्‍यांदा हा व्हायरस संक्रमित करत नाही.

6 महीन्यांपर्यंत इम्यूनिटी!
नुकतेच चीनच्या वुहानमध्ये एक स्टडीत डॉक्टरांना आढळले की, कोरोना झाल्यानंतर लोकांच्या शरीरात अँटीबॉडी बनते आणि त्याच्या प्रभाव 6 महिन्यापर्यंत राहातो. म्हणजे 6 महिन्यादरम्यान पुन्हा कोरोनाचा धोका राहात नाही. वैद्यकीय भाषेत यास टी-सेल म्हटले जाते. या सेल्स मनुष्याच्या शरीरातील संक्रमणाशी लढतात. टी-सेल शरीरात कोरोना किंवा अन्य व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर तयार होतात.