‘जग गोल नाही’, हे सिध्द करण्यामध्येच गेला ‘एस्ट्रोनॉट’चा जीव (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जग गोल नाही हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात एका अमेरिकी अ‍ॅस्ट्रोनॉटचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला. आपले विचार सिद्ध करण्यासाठी अ‍ॅस्ट्रोनॉटने शनिवारी स्वत: तयार केलेल्या रॉकेटने आकाशात उड्डान केले, परंतु रॉकेट वर जाताच त्याचा स्फोट झाला आणि ते खाली कोसळले. या अ‍ॅस्ट्रॉनॉटचे नाव माइक ह्यूजेस आहे, त्याला ‘मॅड’ माइक ह्यूजेस नावाने देखील ओळखले जाते.

या घटनेची माहिती सायन्स चॅनलने ट्विटरवर दिली. त्यात म्हणले आहे की ह्यूजेसला पहिल्यांपासून स्पेसमध्ये लॉन्च व्हायचे होते. ह्यूजेस लिमोजिन ड्रायवर देखील होते ज्यांच्या नावे लॉन्गेस्ट लिमोजिन रॅंप जंपचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 2002 मध्ये त्यांनी त्यांच्या लिमोजिन कारने 103 फूटांचे अंतर गाडी उडवत पार केले होते.

एका व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले की रॉकेट वर उडते आणि त्याचे पॅराशूट फाटते. वाफेवर उडणारे रॉकेट वर तर गेले परंतु फक्त 10 सेकेंदात ते जमिनीवर आदळले. व्हिडिओमध्ये रॉकेट वाळवंटात आदळतानाचा आवाज देखील आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की लॉन्चिंग वेळी रॉकेट जमिनीवर आदळले. ज्यामुळे त्याचे पॅराशूट फाटले. या दुर्घटनेचे हेच कारण सांगितले जात आहे.

वृत्तसंस्थानुसार, एका व्हिडिओमध्ये ह्यूजेस म्हणाले होते की, ते आउटर स्पेसच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाऊ इच्छित आहेत जेथून कळेल की पृथ्वी गोल नाही. ह्यूजेसने एका व्हिडिओ मेसेजमध्ये म्हणले होते की ते लोकांना दाखवू इच्छितात की ते सर्व काही करू शकतात जे त्यांच्या जीवनात असाधारण आहे. ते म्हणाले होते की माझी गोष्ट विश्वासाच्या पलीकडे आहे.