अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आणि NBA स्टार ‘कोबे ब्रायंट’चा मुलीसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यु

लॉस एंजेलिस : वृत्त संस्था – लोकप्रिय बॉस्केटबॉलपटु कोबे ब्रायंट व त्याची १३ वर्षाची मुलगी गियाना यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यु झाला. या अपघातात एकूण ५ जणांचा मृत्यु झाला.

४१ वर्षाच्या कोबे ब्रायंट याने आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत पाच राष्ट्रीय बास्केटबॉल असोशिएशन विजेतेपद पटकाविले होते. निवृत्तीनंतर ब्रायंट माध्यमामध्ये आला होता. २००८ मध्ये डियर बॉस्केटबॉल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉटसाठी त्याने आॅस्कर पुरस्कार जिंकला होता. त्याने खेळामधून निवृत्तीबद्दल लिहिलेल्या एका कवितेवर हा चित्रपट आधारित होता. एनबीएचा हा बॉस्केटबॉलपटु एक आख्यायिका बनून राहिला होता.

धुक्याच्या वातावरणात लॉस एंजेलिसच्या उत्तर पश्चिम दिशेला ३० मैलावर कॅलाबासजवळ त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यात हेलिकॉप्टरमधील सर्व पाच जणांचा मृत्यु झाला.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रायंट यांच्या मृत्युवर भयंकर बातमी अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

 

You might also like