विवेकानंद यांना ‘विवेक का मुंडन’ म्हणाले ट्रम्प, कॉमेडियननं केली ‘थट्टा’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते. गुजरातमध्ये त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. यावेळी अहमदाबादमध्ये असलेले जगातील सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा स्टेडियममध्ये 1 लाख पेक्षा जास्त लोकांना त्यांनी संबोधित केले. या दरम्यान त्यांनी संबोधनाची सुरुवात हिंदीत देखील केली. परंतु त्यांनी या संबोधनादरम्यान त्यांनी भारतीय नावांचे अनोखेच उच्चारण केले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नावाचे उच्चारण तर केले परंतु सोशल मीडियावर ते हस्याचे कारण बनले.

 

 

अमेरिकी कॉमेडियन ट्रेवर नोआ यांनी आपल्या कॉमेडी शो ‘The Daily Show With Trevor Noah’ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदी शब्दांच्या उच्चारणाची चांगलीच मस्करी केली. सोशल मीडियावर ट्रेवर नोआ यांच्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकी अध्यक्ष स्वामी विवेकानंद यांच्या नावाऐवजी विवेक का मुंडन बोलताना दिसले. ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील हस्यास्पद होते. व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे हिंदी उच्चारण ऐकूण कॉमेडियनला हस्याच्या उकळ्या फुटल्या.

 

 

या व्हिडिओमध्ये कॉमेडियन ट्रेवर नोआ म्हणाले की, जर त्यांचे उच्चारण योग्य जरी असते तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी चूकीचे होते. ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर ट्विटरवर लोक त्यांना ट्रोल करु लागले. लोक म्हणू लागले की ते नमस्ते असे असते. मी भारतीय लोकांना सांगू इच्छित आहे की याचा चूकीचा अर्थ घेऊ नका. ट्रम्प हिंदी शब्दाचे उच्चारण योग्य पद्धतीने करु शकले नाहीत. ट्रेवरच्या या फनी व्हिडिओवर चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.