American Crime Story : बिल क्लिंटन-मोनिका ‘प्रेम’ प्रकरण दिसणार पडद्यावर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारतात क्राईम पेट्रोल सारखे अमेरिकेतही ‘अमेरिकन क्राइम स्टोरी’ असा एक कार्यक्रम प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम एफएक्स वाहिनीवर प्रसारित होतो. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन लवकरच सुरु होणार आहे. या तिसऱ्या सिझनचे वैशिष्ट्य म्हणजे या सिझनमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविंस्की यांचे प्रेमप्रकरण दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

‘अमेरिकन क्राइम स्टोरी’चा हा सिझन नेमका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या क्राइम स्टोरीचे पडसाद अमेरिकेच्या राजकाणावर होऊ शकतो. तसंच या स्टोरीमुळे एकेकाळी तिथल्या राजकारणात वादळ निर्माण झाले होते. त्या प्रकरणातील सेक्स स्कँडलच्या चर्चांना पुन्हा वाचा फुटनार आहे. विशेष म्हणजे या सीरीजची निर्मीती मोनिका यांनी केली आहे. २७ सप्टेंबर २०२०च्या दरम्यान या सीरिजीची सुरुवात होईल. म्हणजे तेव्हा नेमका अमेरिकेच्या निवडणुकाच्या प्रचाराचा काळ आहे.

मी स्क्रिप्ट वाचली असून मला ती फार आवडली आहे. माझ्या मते अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर सीरिजचा काही परिणाम होणार नाही, असं एफएक्स नेटवर्क्सचे सीईओ जॉन लँडग्राफ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, १९९८ मधील ही घटना असून तेव्हाचे अमेरिके राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविंस्की यांच्यातली सेक्स स्कँडलने अमेरिकेत वादळ आले होते. तेव्हा मोनिका या व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून काम करत होत्या. तेव्हा मोनिका या २२ वर्षांच्या होत्या तसंच त्यांच्यात आणि बील क्लिंटन यांच्यात लैंगिक संबंध होते. मात्र मोनिका यांनी बील क्लिंटन यांनी फायदा घेतल्याचे सांगितले होते.

या प्रकरणात क्लिंटन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र काही काळाने त्यांनी यावर कबुली देत लैंगिक संबंध असल्याची बाब सांगितली होती. हे प्रकरण फक्त अमेरिकेतच नाही तर जगभर गाजले होते. तसंच या सर्व प्रकरणात बील क्लिंटन हे आरोप मुक्तही झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –