Coronavirus : अमेरिकेत सुद्धा होणार प्लाझ्मा थेरेपीने उपचार, राष्ट्रपती ट्रम्प यांनी दिली मंजूरी

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिका कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित जगातील देशांपैकी एक आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे अमेरिकेत सुद्धा प्लाझ्माद्वारे उपचारासाठी आपत्कालीन मंजूरीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

राष्ट्रपतींनी एक वक्तव्य जारी करताना म्हटले की, आज मी चीनी व्हायरस विरूद्धच्या लढाईत एक एतिहासिक घोषणा करत आहेत, जी अनेक जीवांना वाचवणार आहे. एफडीए (फुड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) ने कोरोनासाठी एक आपत्कालिन उपचाराला मंजुरी दिली आहे, ज्यास प्लाझ्मा म्हणतात.

वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, प्लाझ्मामध्ये शक्तिशाली अँटीबॉडी असतात, ज्याद्वारे ते कोरोना व्हायरसशी लढण्यास मदत करू शकतात. भारतात प्रथमपासूनच यास मंजूरी देण्यात आली होती, ज्याचे चांगले परिणाम दिसून आले. अमेरिकेच्या एफडीए विभागाने वक्तव्यात म्हटले आहे की, कोविड 19 च्या उपचारात प्लाझ्मा थेरेपी खुप प्रभावी ठरू शकते. याच्या वापराने संभाव्य धोका कमी केला जाऊ शकतो. मात्र, काही तज्ज्ञांचे मत आहे की, याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात.

न्यूयॉर्कचे एक वैद्यकीय तज्ज्ञ होरोविट्ज यांनी म्हटले की, प्लाझ्मा थेरेपी कोरोना व्हायरसशी लढण्यात उपयोगी ठरते किंवा नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. सध्या तिची अनेक परीक्षणे करणे जरूरी आहे. परंतु, अशाप्रकारे कोरोनाचा उपचार म्हणून ती आणता येणार नाही.

अमेरिकेत कोराना व्हायरसने सुमारे 1.76,000 मृत्यू झाले आहेत. यावरून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडन यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प देशात कोरोना महामारीवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत. अमेरिकेत आपर्यंत 5,874,123 केस समोर आल्या, तर3,167,028लोग बरे झाले आहेत. सध्या 2,526,491 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.