अमेरिकेकडे येत असलेल्या ‘एलेक्स’ वादाळाला अणुबॉम्बनं उडवायचं का ? असं विचारतायेत डोनाल्ड ट्रम्प !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्याचबरोबर अमेरिकेतील प्रसारमाध्यमांच्या निशाण्यावर देखील असतात. यावेळी देखील त्यांनी असेच वादग्रस्त आणि अनोखे विधान केले असून यामुळे जगभरात चर्चा सुरु आहे.

अमेरिकेकडे येणाऱ्या तुफानाला थांबवण्यासाठी आपण अणुबॉम्बचा वापर करणार असल्याचे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. एका अमेरिकन वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या कार्यालयात ट्रम्प बसलेले असताना त्यांनी या वादळाच्या मुद्द्यावर आपल्या अधिकाऱ्यांशी बोलताना म्हटले कि, आपण हे वादळ थांबवण्यासाठी अणुबॉम्बचा वापर करून या वादळाला थांबवू शकतो. त्यामुळे आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून सुरु झालेले हे ‘एलेक्स’ नावाचे वादळ लवकरच अमेरिकेपर्यंत येऊन पोहोचणार आहे.यानंतर आता ट्रम्प यांच्या या विधानावर मोठी चर्चा सुरु झाली असून आपल्या वैज्ञानिकांना यावर शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, याआधी देखील ट्रम्प यांनी अशी विधाने केली असून त्यांच्यावर यामुळे मोठ्या प्रमाणात टीकादेखील करण्यात आली होती. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर देखील त्यांनी केलेल्या विधानानंतर देखील त्यांच्यावर जगभरातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.