डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं असं ‘ट्विट’ अन् ‘आयसिस’चा म्होरक्या बगदादी ठार झाल्याच्या चर्चेला उधाण !

वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आणि त्यानंतर आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी ठार झाल्याच्या चर्चेला प्रचंड उधाण आलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अमेरिकेनं आयसिसचा म्होरक्या बगदादी याच्याविरूध्द अमेरिकेची मोठी कारवाई चालु असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानंतर बगदादी ठार झाल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

काही वेळानंतर डोनाल्ड ट्रम्प हे मोठी घोषणा करणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष ट्रम्प यांच्या घोषणेकडे लागले आहे. एप्रिल महिन्यात आयसिसनं बगदादीचा व्हिडिओ जारी केला होता. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच आयसिसनं बगदादीचा व्हिडिओ प्रसिध्द केला होता. मात्र, तो व्हिडिओ नेमका कधी रेकॉर्ड करण्यात आला हे समजू शकलं नव्हतं. व्हिडिओमध्ये त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख देखील केला होता. काही वेळानंतर ट्रम्प हे घोषणा करणार आहेत आणि त्यानंतरच सर्व चर्चेला पुर्णविराम मिळणार आहे.

Visit : policenama.com