अमेरिकन सिंगर ‘कॅली शोर’ला ‘कोरोना’ची लागण ! म्हणाली – ‘एकदाच बाहेर पडले अन् विळख्यात अकडले’

पोलीसनामा ऑनलाईन :अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस खूप वेगानं पसरत आहे. अनेक दिग्गज कलाकार या व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. काही कलाकारांचा यामुळं मृत्यूही झाला आहे. अलीकडेच अमेरिकन सिंगर जोई डिफीचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जगभरात बाधित लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. अमेरिकन सिंगर कॅली शोर हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिनं सोशलवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

कॅली शोरनं ट्विट करत सांगितलं की, “मी गेल्या 3 आठवड्यांपासून क्वारंटाईनमध्ये होते. फक्त किराणा सामान आणण्यासाठीच एकदा किंवा दोनदा बाहेर पडले होते. तरीही मी कोरोनाची शिकार झाले आहे. सध्या आधीपेक्षाही चांगलं वाटत आहे. परंतु हा व्हायरस किती खतरनाक आहे याचा पुरावाही मला मिळाला आहे. हे पाहणं इंटरेस्टींग आहे की, एवढं सगळं होत असतानाही लोक याला गांभीर्यानं घेत नाहीत.”

आपल्या प्रकृतीबद्दल सांगताना कॅली म्हणाली, “सुरुवातीचे काही दिवस खूप कठिण झालं होतं. माझ्या आयुष्यात मी असं कधी अनुभवलं नव्हतं. माझ्या अंगभर वेदना होत होत्या. मला ताप आला होता ज्याची तीव्रताही खूप होती. काहीही स्मेल करणं किंवा टेस्ट करणं मी पूर्णपणे विसरून गेले आहे.” असंही तिनं सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like