अंतराळात ‘ही’ चमकणारी ‘चीज’ कोणती आहे ? नासाने शेअर केले ‘फोटो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेची अंतरिक्ष संस्था नासाने ‘चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी’ लाँच केल्यानंतर आता अंतराळाचे उत्तम फोटो पाठवत आहे. नोबेल पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकी वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावाने तयार केलेल्या या टेलिस्कोपला अंतराळातील उच्च दर्जाच्या प्रकाश किरणांचा अभ्यास करण्यासाठी 23 जुलै 1999 रोजी लाँच केले होते. मागील दोन दशकांपासून या टेलिस्कोपने अनेक फोटो पाठवले असून त्याने पाठवलेल्या कॅसियोपिया A हा फोटो आतापर्यंतचा सर्वात सुंदर फोटो आहे. हा फोटो नासाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे.

नासाने आपल्या पाठवलेल्या या ऑब्जर्वेटरीद्वारे त्याच्यामध्ये असलेल्या उच्च रिज़ॉल्यूशनवाल्या मिररमुळे दुसऱ्या एक्स-रे दुर्बिणीच्या तुलनेत 100 पट अधिक चांगला फोटो काढू शकतो. चंद्र नाव असलेल्या या ऑब्जर्वेटरीचे काम 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. कॅसियोपिया A हे पृथ्वीपासून 11 हजार प्रकाशवर्ष दूर आहे. अनेक चमकत्या ताऱ्यांमुळे तो एक चमकत्या कचऱ्याप्रमाणे वाटत आहे. खगोल शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार ज्यावेळी ताऱ्यांमध्ये प्रज्वलनासाठी इंधन संपते त्यावेळी ते आपापसात घर्षण करतात. घर्षणातून वाचलेला ताऱ्याचे द्रव्यमान 1.4 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तो श्वेत बटुतारा बनतो. यालाच सुपरनोवा असे देखील म्हटले जाते. हा तारा आकाराने पृथ्वीच्या इतका असतो.

दरम्यान, हा फोटो अपलोड केल्यानंतर यामध्ये नासाने कॅप्शन लिहिले आहे कि, 20 वर्षांपूर्वी चंद्राने पहिली कॅसियोपिया A हे पहिले छायाचित्र काढले होते. त्यानंतर आता दोन दशकांनी त्याने हे छायाचित्र काढले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like