अभिमानास्पद ! ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’मध्ये भारताचा ‘जलवा’, मुंबईच्या ‘डान्स क्रू’ची ‘गोल्डन बजर’ घेत ‘लाईव्ह शो’मध्ये ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा डान्स क्रू V.Unbeatableने विदेशी शो अमेरिकाज गॉट टॅलेंट २०१९ च्या लाईव्ह शोमध्ये एन्ट्री मिळवत आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करून दिला आहे. V.Unbeatableने या फेमस हॉलिवूड शोच्या स्टेजवर आपल्या खतरनाक अ‍ॅक्रोबेटीक्स डान्स फॉर्मने आग लावली आणि गोल्डन बझरही मिळवला. गोल्डन बझरचा अर्थ असा आहे की, हा डान्स क्रू आता थेट लाईव्ह शोज करण्यासाठी पुढे गेला आहे.

V.Unbeatable डान्स क्रूने अमेरिकाज गॉट टॅलेंट २०१९ च्या जजेससमोर राम लीला सिनेमातील ततड ततड या गाण्यावर जबरदस्त सादरीकरण केलं. हा डान्स पाहून जजेस खूप इम्प्रेस झाले. यावेळी शोचे मेन जज सायमन कॉवेल, हाउद मंडेल, जुलिआना हग आणि गाब्रिएल युनियन-वेड, पू्र्व NBA स्टार ड्वेन वेड गेस्ट जजच्या रुपात उपस्थित होते. ड्वेन यांना V.Unbeatable डान्स क्रूचे सादरीकरण इतके आवडले की, त्यांनी गोल्डन बझर देत त्यांना लाईव्ह शोमध्ये पोचवलं.

https://youtu.be/ztMafqyXHXU

गोल्डन बझर देण्याआधी ड्वेन वेड यांनी डान्स क्रू V.Unbeatable चे कौतुक केले आणि म्हणाले की, “या क्रूचे दमदार सादरीकर पाहून माझं हृदय जोरात धडधडू लागलं आहे.”

V.Unbeatable ला जजेस, शोचे होस्ट टेरी क्रूज आणि जनतेकडून स्टँडिंगओवेशन सोबतच खूप सारे कौतुकंही मिळाले. या डान्स क्रूने आपल्या सादरीकरणादरम्यान पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता. यावर विकास असं लिहिलं होतं. डान्स क्रूचा असं करण्यामागचा हेतू आपल्या मित्राला श्रद्धांजली देणं हा होता. त्यांच्या या मित्राचा 6 वर्षांपूर्वी डान्स रिहर्सल दरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी जजेसना सांगताना क्रूमधील एक डान्सर म्हणाला की, “6 वर्षांपूर्वी आम्ही रिहर्सल करत होतो. आमच्या सोबत एक अपघात घडला. आमचा एक मित्र पडला आणि त्याची बॉडी पॅरलाईज झाली. यानंतर काही आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला.”

हा डान्सर पुढे म्हणाला की, “विकासचं स्वप्न होतं की, त्याला कधी अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळावी. त्यामुळे त्याचे 29 डान्सर साथी त्याचे स्वप्न सत्यात आणत आहेत.”

आरोग्यविषयक वृत्त