डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच केलं ‘हे’ काम, आजपर्यंत करत होते ‘कानाडोळा’

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अजूनपर्यंत मास्क घालण्यास नकार देत होते आणि मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर त्यांनी शनिवारी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या मास्क घातल्याचे दिसून आले. अमेरिकेत आतापर्यंत व्हायरसने 32 लाख लोक संक्रमित झाले आहेत, तर 1.34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी हॉस्पिटलच्या दौर्‍यावर असताना मास्क घातला होता. त्यांनी आरोग्य अधिकार्‍यांचे निर्देश प्रथमच पाळले.

हॉस्पिटलमध्ये जाताना जरूर घाला मास्क : ट्रम्प

ट्रम्प शनिवारी वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये जखमी आणि कोविड-19ने संक्रमित सैनिकांची भेट घेण्यासाठी गेले होते. लष्कराचे हॉस्पिटल वॉशिंग्टनच्या उपनगरात आहे. ते या ठिकाणी विमानाने आले होते. ते जेव्हा व्हाइट हाऊसमधून निघाले तेव्हा पत्रकारांना म्हणाले, जेव्हा तुम्ही खासकरून हॉस्पिटलमध्ये असाल तेव्हा मास्क जरूर घातला पाहिजे.

ट्रम्प यांनी वॉल्टर रीड हॉलवेमध्ये पोहचल्यानंतर दौरा सुरू करताच मास्क घातला. ते जेव्हा वॉल्टर रीडला पोहचले आणि हेलिकॉप्टरमधून उतरले तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. कोरोना व्हायरस महामारीचा काळ सुरू झाल्यापासून राष्ट्रध्यक्ष ट्रम्प सर्वात उशीरा मास्क घालणार्‍यांपैकी एक आहेत. वरिष्ठ रिपब्लिकन नेते उप-राष्ट्रपती माइक पेंस यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढताच मास्क घालण्यास सुरूवात केली होती. रिपब्लिकन गव्हनरने दक्षिण आणि पश्चिममधील राज्यात कोरोना व्हायरस गंभीर झाल्यानंतर मास्क घालण्यावर जोर दिला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like