बगदाद एअरपोर्टवर अमेरिकेचं ‘स्ट्राइक’, इराणचा मिलिट्री जनरल ‘सुलेमानी’सह 8 ठार

बगदाद : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर रॉकेट हल्ला केला असून या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यु झाला आहे. इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी या हल्ल्याची माहिती दिली. इराणच्या कुर्द फोर्सचा प्रमुख सुलेमानी याचा या हल्ल्यात मृत्यु झाला आहे. इराणी टिव्हीने सुलेमानी याच्या मृत्युला पुष्टी दिली आहे.

सुलेमानी हा पश्चिम अशियामध्ये इराणीच्या मोहिमेचे प्रमुख रणनीतीकार मानला जात होता. सुलेमानीवर सीरियाशी संबंध असल्याचा व इस्त्रायलवर रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका सुलेमानी याचा बराच काळ शोध घेत होती.

इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने ३ रॉकेटचा हल्ला केला. रॉकेट पडल्याने एअरपोर्टवरील वाहनांना आग लागली आहे. रॉकेटने पॉप्युलर मोबिलाईजेशन फोर्सेसशी संबंधित वाहनांना लक्ष्य केले. सुलेमानी  काफिला बगदाद एअरपोर्टच्या दिशेने जात असताना एअरपोर्टपासून काही अंतरावर त्यांच्या काफिल्यावर रॉकेट हल्ला झाला.

रॉकेट हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या ट्विटर हैंडलवर अमेरिकेचा झेंडा ट्विटर केला. मात्र, त्यावर काहीही टिप्पणी केलेली नाही. गुरुवारी रात्री उशिरा इराकची राजधानी बगदादवर हल्ला केला. त्यावेळी इराणचे अत्यंत प्रशिक्षित कटस फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना मारले आहे. अचूक हल्ला करुन अमेरिकेने एक मोठे यश मिळविले असल्याचे बोलले जाते.
या हल्ल्यात पॉप्युलर मोबलाईजेशन फोर्सचे उपकमांडर अबु मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यु झाल्याचे सांगितले जाते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/