अमेरिकेच्या डोळ्यातही खुपत होता जैशचा ‘तो’ तळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांना बालाकोट येथे प्रशिक्षण दिल्याचे उघड झाल्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानमधील बालाकोट येथील पंचतारांकित दहशतवादी तळ हा अमेरिकेच्याही डोळ्यात खुपत होता. पण, त्यांना त्यावर कारवाई करता आली नव्हती. ती भारतीय हवाई दलाने केली आहे.

बालाकोट कॅम्प हा केवळ जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा दहशतवादी कॅम्पच होता असे नाही तर २००२ पासून अफगाणिस्तानच्या तालिबानशी संलग्न होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने पकडलेल्या अनेक तालिबानींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बालाकोट शिबिरात प्रशिक्षण घेतले असल्याचे सांगितले होते. अमेरिकेला या बालाकोटच्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्पची माहिती होती. दक्षिण आशियामध्ये बालाकोटला जिहादचा केंद्रबिंदू असे संबोधले गेले आहे.

अमेरिकेचे लष्कर अफगाणिस्तानमध्ये असताना त्यांनी पाकिस्तानच्या सीमेवरील अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करुन दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते. मात्र, या दहशतवादी कॅम्पची माहिती असूनही त्यांना त्यावर हल्ला करणे शक्य झाले नव्हते. ते भारतीय हवाई दलाने करुन दाखविले आहे.

या बालाकोट येथील कॅम्पमध्ये पाकिस्तानी सैन्य दलातील माजी अधिकारीही दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत असल्याची माहिती अमेरिकेला होती. या सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबतच खुद्द मौलाना मसूद अजहरही काही खास निमित्ताने या दहशवाद्यांना कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित करणारी भाषणे करत असे.

या दहशतवादी कॅम्पचा केवळ जैश-ए-मोहम्मद नव्हे तर हिजबुल मुजाहिद्दीनकडून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारताची दोन विमानं पाडली, एक वैमानिक ताब्यात, पाकचा दावा

काल घुसून मारलं अन् आज तोंड फोडलं ; Airstrike भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं 

पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत शिरली ; बाॅम्ब टाकल्याची शक्यता ? 

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या