कोर्टानं ‘त्याला’ बलात्काराच्या आरोपातून केलं ‘मुक्त’, पीडित महिला ‘त्या’ दिवशी आरोपीची पत्नी असल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या कोर्टाने एका व्यक्तीला बलात्काराच्या आरोपावरून निर्दोष मुक्त केले आहे. कोर्टाने आरोपीला असे सांगत निर्दोष मुक्त केले कि, ज्या दिवशी आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्या दिवशी तक्रारदार त्याची पत्नी होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश उमेदसिंह ग्रेवाल म्हणाले की, महिलेने 5 जुलै 2016 रोजी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता, परंतु ती त्या दिवशी आरोपीची पत्नी असल्याने त्याला बलात्काराचा मुद्दा मानता येणार नाही.

कोर्टाने म्हंटले कि, ‘हे स्पष्ट आहे की तक्रारदाराने 2 नोव्हेंबर 2015 किंवा त्यापूर्वी आरोपीशी लग्न केले होते. तिच्या स्वत: च्या याचिकेनुसार … आरोपीनी तिच्यावर 5 जुलै 2016 रोजी बलात्कार केला, परंतु त्यादिवशी ती त्याची पत्नी होती. ‘

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आरोपीसह पंजाबमध्ये राहत होती. या वेळी तिला समजले की, चोरीच्या प्रकरणात त्या व्यक्तीला आधीच दोषी ठरविण्यात आले होते, ज्यामुळे तो तुरूंगात गेला होता. यामुळे ती त्याला न सांगताच दिल्लीला आली. यांनतर आरोपीनेही दिल्ली गाठत तिला सुधारण्याचे आश्वासन दिले, यानंतर हे जोडपे एकत्र राहू लागले. काही दिवसानंतर आरोपीने महिलेचे दोन लाख रुपये चोरले. ज्यानंतर पत्नीने त्याच्याबरोबर राहण्यास नकार दिला. असे असूनही आरोपी तिच्या घरी येत होता आणि वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता.

दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. कोर्टाने म्हटले आहे की, “जेव्हा आरोपीने तक्रारदाराशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते, तेव्हा त्या वेळी ती त्याची पत्नी होती आणि म्हणूनच बलात्काराचा कोणताही गुन्हा बनू शकत नाही.

फेसबुक पेज लाईक करा –