अमेठीत राहुल गांधींना १५ वर्षात जमले नाही ते करणार स्मृती इराणी

अमेठी : वृत्तसंस्था – केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर प्रथमच मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एक घोषणा केली ज्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. अमेठीत घर बांधण्याची स्मृती इराणी यांनी घोषणा केली आहे. येथे दखल घेण्यासारखी गोष्ट ही आहे की राहुल गांधी यांनी या मतदारसंघाचे १५ वर्ष प्रतिनिधीत्व केले तरी देखील त्यांनी येथे घर बांधले नाही.

अमेठीत बांधणार घर –

स्मृती इराणी यांनी घर बांधण्याची घोषणा उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत केली. स्मृती इराणी यांनी घर बांधण्यासाठी गौरीगंज परिसरात प्लॉट देखील बघितला आहे. त्यांनी म्हंटले की, अमेठीमध्ये आता माझे कायमस्वरूपी घर असेल आणि माझे घर सर्वांसाठी खुले असेल. आता मी येथील पाहुणी असणार नाही.

राहुल गांधींवर साधला निशाणा –

स्मृती इराणी दोन दिवसीय अमेठी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या जनसभेत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हंटले की नामदार लोक येथून खासदार झाल्यावर पाच वर्ष मतदारसंघाकडे फिरकले नाहीत. अमेठीची जनता चिराग ( जादूचा दिवा) घेऊन दिल्लीपर्यंत शोध घेत राहिली तरीही सापडत नव्हते.

अमेठीच्या जनतेची सेवा –

त्यांनी म्हंटले की अमेठीतील जनतेला घेतलेल्या निर्णयाचा आवाज पूर्ण जगभर ऐकू येत आहे. अमेठीच्या जनतेने नामदारांना घरी बसवून विकासाची निवड केली आहे. मी प्रामाणिकपणे अमेठीच्या जनतेची सेवा करेल.

काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी तब्बल ५०, ००० मतांनी पराभव केला. काँग्रेसला मते देणाऱ्या ४ लाख मतदारांची देखील मी प्रामाणिकपणे सेवा करेल. कसल्याही भेदभावाची वागणूक देणार नाही, असं मत स्मृती इराणी यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून २००४ मध्ये लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर २०१९ पर्यंत १५ वर्षे राहुल गांधी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अमेठीमध्ये घर बांधण्याचा निर्णय घेऊन या मतदारसंघाचे खूप वेळ प्रतिनिधीत्व करण्याचाच निश्चय केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा या लोकसभा मतदारसंघातून निवडून येणे जड जाणार आहे.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’