Ameya Khopkar | हिंदूंचे सण हिंदुस्थानात नाहीतर काय पाकिस्तानात जाऊन साजरे करायचे का? – अमेय खोपकर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – भोंगा आणि फाटके वाद पुन्हा एकदा राज्यात सुरु झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके न फोडण्याचे किंवा कमी प्रमाणात रात्री दहाच्या अगोदर फोडण्याचे आवाहन अनेक पक्ष आणि सरकार करत आहे. पण मनसे (MNS) त्याला विरोध करत आहे. मनसेचे अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांच्या निवासस्थानी यावर त्यांनी भाष्य केले आहे. हिंदूंचे सण हिंदुस्थानात नाहीतर काय पाकिस्तानात (Pakistan) जाऊन साजरे करायचे का? असा प्रश्न अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी विचारला आहे.

मी माझ्या विधानावर ठाम आहे. आम्ही दणक्यात फटाके फोडणार. आणि सर्वांनी दिवाळी निमित्त फटाके फोडावे. यांचे भोगे बारा महिने सुरु असतात. तेव्हा आम्हाला देखील त्रास होतो आणि आम्ही तो सहन करतो. त्यामुळे आता दिवाळी आमचा सण आहे. थोडा त्रास तुम्ही देखील सहन करा. ज्यांना  आमचा हिंदू सण सहन होत नसतील, त्यांनी देश सोडून निघावे, असे अमेय खोपकर (Ameya Khopkar) म्हणाले होते.

तसेच यावेळी त्यांनी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर देखील टीका केली. किशोरी पेडणेकर यांनी या विषयावर बोलू नये. कारण त्यांना भोग्यांचा त्रास होत नाही आणि फक्त फटाक्यांचा त्रास होतो. सुषमा अंधारे (Sushma Andhare) या शिवसेनेत आल्यापासून पेडणेकर आणि इतर महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे त्या काहीतरी काम केल्याचे दाखवायला पाय आपटत आहेत. तसेच सुषमा अंधारे यांची जागा तयार झाल्याने त्यांचा जळफळाट होत आहे. किशोरी पेडणेकर यांना एआयएमआयएम मध्ये (AIMIM) जायचे आहे, म्हणून त्या हिंदूंच्या सणांचा द्वेष करत आहेत, असे देखील खोपकर म्हणाले.

तसेच माझ्यावर टीका जरुर करा पण खालच्या पातळीवत टीका केली तर मी घुसून मारेन.
सेनेच्या लोकांना मी सोडणार नाही. आम्ही हिंदूंचा सण धुमधडाक्यात साजरा करणार आहोत.
हिंदूंची संस्कृती सगळ्यांना कळली पाहिजे.
त्यामुळे हिंदूंच्या सणाविरोधात जो बोलेल त्याच्या कानाखाली आम्ही आवाज काढू, असे खोपकर म्हणाले.

यावेळी खोपकरांनी शिंदे – मनसे युतीवर देखील भाष्य केले. आमची मने जुळली आहेत.
त्यामुळे युतीचा निर्णय राज ठाकरे (Raj Thackeray) घेतील.
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हितासाठी काही लोक एकत्र आले, तर चांगलेच आहे, असे खोपकर म्हणाले.

Web Title :-  Ameya Khopkar | Should Hindu festivals be celebrated in India or Pakistan? – Amey Khopkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Nilesh Lanke | राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Maharashtra Daura | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा, ठाकरे गटाचे बालेकिल्ले निशाण्यावर