‘कोरोना’ महामारी दरम्यान चीनच्या आणखी एका व्हायरसचा भारताला धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    भारतात कोरोना महामारीचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. दररोज हजारोच्या संख्येने लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. यादरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांनी भारतात आणखी एका चीनी व्हायरसच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. कोविडच्याविरूद्ध लढाई सुरू असताना चीनच्या आणखी एका व्हायरसने भारतात नवा आजार वाढण्याची भिती आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (खउचठ) च्या शास्त्रज्ञांनी कॅट क्यू व्हायरस (उटत) नावाचा आणखी एक व्हायरस शोधला आहे, जो देशात आजार पसरवू शकतो.

भारतावर धोक्याचे सावट

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी कॅट क्यू व्हायरस नावाचा आणखी एक नवा व्हायरस शोधला आहे, जो देशात आजार पसरवू शकतो. हा व्हायरस आर्थ्रोपोड-निर्मित व्हायरसच्या श्रेणीत येतो आणि डुक्कर आणि क्यूलेक्स नावाच्या मच्छरांमध्ये आढळतो. चीन आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणात सीक्यूव्हीने ग्रस्त लोक आढळत आहेत.

भारतात आजार पसरण्याची शक्यता

दोन लोकांच्या सिरम सॅम्पलमध्ये अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडी सापडल्याने यास दुजोरा मिळाला आहे, हे दोघे कर्नाटकमध्ये सापडले आहेत. त्यांच्या दोघांचे सॅम्पल 2014 आणि 2017 मध्ये घेण्यात आले होते. याबाबत आयसीएमआरचे मेडिकल जर्नल आयजेएमआरमध्ये म्हटले आहे की, मानवी सिरम सॅम्पलमध्ये अँटी सीसीक्यू आयजीजी अँटीबॉडी मिळण्याबाबत टेस्ट करण्यात आल्या होत्या आणि मच्छरांमध्ये सीक्यूव्हीच्या रिप्लेक्शनची चाचणी करण्यात आली होती.

यातून संकेत मिळतो की, भारतात सीक्यूव्हीने होणारा आजार पसरण्याची शक्यता आहे. यासाठी संरक्षणात्मक धोरणांतर्गत जास्तीत जास्त लोकांची स्क्रीनिंग आणि स्वाइन सिरम सॅम्पल्सची चाचणी करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून दहा उष्ण कटिबंधीय व्हायरसच्या प्रसाराबाबत जाणून घेता येईल.

आपत्कालिन स्थितीपूर्वीच तयारी करता येईल

आयसीएमआर शास्त्रज्ञांनी म्हटले की, सीक्यूव्ही पसरवणारे मच्छर (ज्यांचे प्रायमरी मेमेलियम होस्ट डुक्कर आहेत) असणे आणि जंगलातील लोकांमध्ये हा व्हायरस सापडण्याच्या एका शक्यतेकडे लक्ष वेधले असता, भारतात या ऑर्थोबुन्या व्हायरसने सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी सीक्यूव्हीसाठी मॉलिक्यूलर आणि सेरोलॉजिकल टेस्ट डेव्हलप करणे, लोकांची आणि डुक्करांची स्क्रीनिंग करणे आणि मच्छरांमध्ये याच्या रेप्लेकेशनची तपासणी करण्याची गरज भासत आहे. जेणेकरून आत्कालिन स्थितीपूर्वी तयारी करता येईल.

सहज होऊ शकतो संसर्ग

आयसीएमआरने म्हटले म्हटले की, मानवी सीरम सॅम्पलमध्ये अँटी-सीव्हीसी भारतीय मच्छरांमध्ये याची हालचाल समजण्यासाठी मच्छरांच्या वेगवेगळ्या प्रजातींची तपासणी करण्यात आली. कॅनेटीक्स आणि अतिसंवेदनशील प्रयोग करण्यात आले होते. यातून समजले की, येथे आढळणारे मच्छर सीक्यूव्ही वायरलच्या प्रति संवेदनशील आहेत, म्हणजे यामुळे सहज संसर्ग होऊ शकतो आणि ते अन्य डुक्कर तसेच माणसांमध्ये पोहचवू शकतात.