70 हजार LED स्क्रीन BJP च अफोर्ड करू शकते, CM ममता यांचा अमित शाह यांच्यावर ‘निशाणा’

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी वेगाने वाढणार्‍या कोरोना प्रकरणांबाबत म्हटले की, लोक प्रवास करत आहेत, यामुळे तो वेगाने पसरत आहे. मला आनंद आहे की, बंगालमध्ये राहाणारे प्रवासी मजूर येथे आनंदाने राहात आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात जायचे नाही. परंतु, आमच्या राज्यातील प्रवासी मजूर दुसर्‍या राज्यांमध्ये अनेक अडचणींचा सामना करत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी पुढे म्हटले की, आम्ही जागतिक बँकेकडून विशेष कर्ज घेतले आहे, ज्यामध्ये 1050 करोड रूपये लॉजिस्टिक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होतील आणि 850 करोड रुपये पेन्शन आणि सामाजिक संरचनेवर खर्च करण्यात येतील.

लॉकडाऊनबाबत पश्चिम बंगालच्या सीएम म्हणाल्या, 30 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. यासोबतच कोरोना मृतांचे कुटुंबिय मृतदेहाचे अंत्यदर्शन सुद्धा करू शकतील. आम्ही लग्न सोहळा आणि मंदिरात 10 ते 15 लोकांना जाण्याची परवानगी दिली आहे.

तर गृहमंत्री अमित शाह यांच्या वर्च्युअल रॅलीवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, सोशल मीडियात अशा बातम्या येत आहेत की, 70 हजार एलईडी स्क्रीन वापरण्यात आल्या. एवढे भाजपाच अफोर्ड करू शकते, आम्ही नाही.

ममता म्हणाल्या, नेहमी लक्षात ठेवा संघटीत ताकदच घाव झेलू शकते. आतापर्यंत 20 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या काही जवानांना सुद्धा संसर्ग झाला आहे. हे ते लोक आहेत, जे या कठिण प्रसंगात समोरून लढाई लढत आहेत.