अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ वर्षात ८,१५८ वेळा ‘खोटे’ बोलले, दररोज ६ वेळा केली फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आपल्या खोट्या विधानांमुळे कायमच चर्चेचा आणि वादाचा विषय ठरले आहेत. आता त्यांनी काश्मीर मुद्यावर असाच एक दावा केला आहे. ज्यामुळे जगभरात त्यांच्यावर टीका करण्यात येेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला काश्मीर प्रकरणी मध्यस्थी करण्यास सांगितले असा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यानंतर व्हाइट हाऊसला देखील स्पष्टीकरण देणे भाग पडले. तर भारतातने या दाव्याला खोटे असल्याचे सांगितले आहे. ८,१५८ वेळा खोटे बोलून फसवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी एका अमेरिकेतील वृत्तपत्राने यासंबंधीची रिपोर्ट प्रकाशित केला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतर ८,१५८ वेळा खोटे बोलून लोकांना फसवले आहेत. अनेक मिडिया रिपोर्ट आणि अमेरिकेतील एका वृत्तपत्राच्या अवाहलानुसार ही माहिती मिळाली आहे. अमेरिकेतील या वृत्तपत्रात सांगण्यात आले की, पहिल्या वर्षी दिवसाला जवळपास ६ वेळा लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या वर्षी तीन पट अधिक खोटे बोलत दिवसाला जवळपास १७ खोटे दावे केलेत.

या वृत्तपत्राने आपल्या अहवालात फॅक्ट चेकर च्या आकड्यांचा हवाला देत सांगितले की, हे फॅक्ट चेकर राष्ट्रपतीने दिलेल्या संशयित विधानांचे विश्लेषण आहे. या आकडेवारी नुसार डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती बनल्यापासून आता पर्यंत ८,१५८ वेळा खोटे बोलले आहेत आणि लोकांना फसण्याचा प्रयत्न केला आहे.

वृत्तपत्रात सांगण्यात आले की यात राष्ट्रपतींनी गेल्या २ वर्षांत केलेल्या ६,००० पेक्षा आधिक आश्चर्य कारक दाव्याचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की फसवणूक करणारे दावे इमिग्रेशन संबंधित होते. यासंबंधित त्यांना आता पर्यंत १,४३३ दावे केले आहेत. ज्यात तीन आठवड्यात केल्या गेलेल्या ३०० दाव्यांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त