राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार ; विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रिपद ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा अजून बाकी असतानाच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील अशी माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक मोठ्या नेत्यांच्या मुलांना भाजपनं गळाला लावले होते, त्यामुळे जर लोकसभेचा निकाल अनुकूल लागला तर हे मोठे नेतेदेखील भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे. यामध्ये विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार राधाकृष्ण विखे पाटील, बीडमधील राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि विजय सिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. जर राज्यात लोकसभेत महायुतीला जनेतेने कौल दिल्यास काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय सिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सुजय विखे यांनी नगरमध्ये बाजी मारल्यास राधाकृष्ण विखे पाटलांना मोठे खाते मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही महिन्यांसाठी कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागते आणि कोणाला डच्चू मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.