कौटुंबिक वादात मुलीनं घेतलं ‘फिनेल’, आईनं मारली 7 व्या मजल्यावरुन ‘उडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  प्रत्येक घरात भांडणे होत असतात. पण, अनेकदा ती टोकाला जातात. त्यानंतर दुदैवी घटना घडतात. पण अंधेरी येथील लोखंडवाला मार्केटमध्ये वेगळी घटना घडली. आई आणि मुलीमध्ये वाद झाला. तो इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात मुलीने घरातील फिनेल पिले. त्यामुळे वडिल तिला घेऊन रुग्णालयात गेले असताना इकडे आईने ७ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेत शशी कमल सागर (वय ५०) यांचा मृत्यु झाला आहे.

याबाबतची माहिती अशी, सागर कुटुंबिय लोखंडवाला मार्केटमधील आर एन ए सोसायटीत राहतात. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता आई शशी आणि मुलगी प्रिया (वय ३१) यांच्यात कौटुंबिक वाद झाला. त्या रागाच्या भरात प्रिया हिने फिनेल पिले. तिला त्रास होऊ लागल्याने तिचे वडिल कमल सागर हे तिला घेऊन कोकिळाबेन रुग्णालयात उपचारासाठी नेले.

त्यावेळी शशी सागर या घरात एकट्याच होत्या. त्यांनीही रागाच्या भरात घराच्या ७ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. इकडे रुग्णालयात नेण्यात आलेल्या प्रियाची प्रकृती आता सुधारत आहे. ओशिवरा पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

You might also like