Video : आमिर खानच्या मुलीचं खरं नाव इरा नव्हे तर…; चुकीचं नाव उच्चारल्यास 5000 दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इरा आमिर खानची मुलगी सध्या ती त्रस्त आहे तिच्या नावामुळे. आपण सगळेच ‘इरा’ म्हणून तिला ओळखतो. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आमिरच्या मुलीने मीडिया आणि सगळेच तिचं नाव चुकीचं उच्चारत असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे एक व्हिडिओ पोस्ट करत तिने तिचं खरं नाव काय हे सांगितलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयराने तिला डिप्रेशनचा सामना करावा लागल्याचं सांगितलं होतं. शिवाय यानंतर आयराने मानसिक स्वास्थासाठी काम करायला सुरुवात केली आहे.

यासाठी तिला २५ इनर्टनची गरज असल्याचंही तिने सोशल मीडियावरून सांगितलं होत. मीडियामध्ये आणि इतर अनेकजण माझं नाव इरा म्हणत असल्याने माझ्या मैत्रिणींनी मला प्रचंड त्रास दिला आहे. पण माझं नाव इरा नसून ते आयरा आहे. तिने तिचं नाव कसं उच्चारावं हे या व्हिडीओत सांगितलं आहे. ती म्हणाली, ” माझं नाव ईरा नाही तर eye-ra म्हणजेच आयरा आहे.

जो कुणी माझं नाव यापुढे चुकीचं उच्चारेल त्याला ५ हजार रुपये द्यावे लागतील. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी मी ते दान करेन.”असं ती म्हणाली. कॅप्शनमध्ये आयरा म्हणाली आहे. ” ira. eye-ra.Nothing Else. म्हणजेच इरा. आयरा. आणखी काही नाही.” आमिरच्या मुलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत आपल्या या भावना व्यक्त काळ्या आहेत.