अमीषा पटेलनं केलं ‘बोल्ड’ फोटोशुट ! ट्रोलर्स म्हणाले- ‘वयाचं भान ठेव’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री अमीषा पटेल सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. असं असलं तरी अमीषा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते. सध्या अमीषा काही अतरंगी फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अमीषानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे जो चाहत्यांना आवडला नाही असं दिसत आहे.

अमीषानं नुकतेच तिच्या इंस्टारून काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिनं फोटो शेअर करताच लगेचच ते व्हायरल होतान दिसले. परंतु ज्याप्रमाणे काहींना तिचा बोल्डनेस आवडला, तसाच काहींना तो खटकताना दिसला. अनेकांनी तिला या बोल्ड फोटोंसाठी ट्रोल केलं आहे.

अमीषाच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी तिला वयाचं भान ठेव असंही म्हटलं आहे. काहींनी तिचे फोटो लाईक आणि शेअरही केले आहेत.

अमीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर धमाकेदार पद्धतीनं आपल्या करिअरला सुरुवात करणारी अमीषा आता सिनेमात दिसत नाही. अनेक इव्हेंटमध्ये ती दिसत असते. अनेक फॅशन शोज आणि फॅशन ब्रँडला ती कनेक्टेड आहे. तिनं सिनेमात कमबॅक करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती फ्लॉप झाली. 2000 साली आलेल्या कहो ना प्यार है या सिनेमातून तिनं हृतिक रोशनसोबत डेब्यू केला होता.