Amisha Patel Hugs Sanjay Raut | अमिषा पटेलनं दिली थेट संजय राऊतांना ‘जादू की झप्पी’..पाहा व्हायरल व्हिडिओ..!
पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर (Dharmaveer).’ अलीकडेच धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रमोशन सोहळा धुमधडाक्यात पार पडला (Amisha Patel Hugs Sanjay Raut). या सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत राजकिय नेत्यांनी सुद्धा आपली मोलाची हजेरी लावली होती.
धर्मवीर हा चित्रपट प्रविण तरडे यांनी दिग्दर्शित केला असून, याच्या ट्रेलर लॉन्जिंगच्या सोहळ्यात सलमान खान (Salman Khan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अमिषा पटेल यांच्या व्यतरिक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सुद्धा उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी देखील या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली होती. या चित्रपटामध्ये प्रसाद ओकनं मुख्य भूमिका साकारली असून, लॉन्जिंग (Dharmaveer Trailer Launch) वेळचा एक दुसरा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. अमिषानं हा व्हिडिओ स्वत: आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये (Amisha Patel Viral Video) ती स्टेजवर जात असताना, तिला खा.संजय राऊत दिसतात. ते दिसताच ती त्यांचा जवळ जाते आणि त्यांना ‘जादू की झप्पी’ देते.
दरम्यान, व्हिडिओमध्ये (Amisha Patel Instagram Video) संजय राऊत सुद्धा तिच्या सोबत मनमोकळेपणानं गप्पा मारतात. तसेच तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, 2.82 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव पाडला आहे.
Web Title : Amisha Patel Hugs Sanjay Raut | amisha patel hugs sanjay raut a single sensation with a viral video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Chandrakant Khaire | ‘आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात असते, काहीही करु शकतो’, नवनीत राणांबद्दल बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली
- MNS Chief Raj Thackeray | ‘वसंत, तू पुण्यात मिसळ महोत्सव घे’ – राज ठाकरे
- Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा