‘अमित बाबू आणि मोदी बाबू हिंमत असेल माझ्याशी मंत्रपठणाची स्पर्धा लावा’ : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था – अमित बाबू आणि मोदी बाबू पूजेचा अर्थ केवळ कपाळावर टिळा लावणे इतकाच नसतो असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचे ताषेरे ओढले आहेत. इतकेच नाही तर, जर हिंमत असेलत माझ्यासोबत मंत्रपठणाची स्पर्धा लावा असे आव्हानही ममता यांनी मोदी आणि अमित शहा यांना दिले.

कोलकाता येथे बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “अमित बाबू आणि मोदी बाबू पूजेचा अर्थ केवळ कपाळावर टिळा लावणे एवढाच होत नाही. हिंमत असेल तर या आणि माझ्यासोबत मंत्रपठणाची स्पर्धा लावा. माझ्याशी स्पर्धा करा आणि मग बघा कोणाला संस्कृतचे जास्त मंत्र माहित आहेत.”

कोलकातामध्ये बोलताना कपाळावर टिळा लावणे आणि मंत्रपठणावरून ममता यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचाही उल्लेख त्यांच्या नावापुढे बाबू शब्द लावत केला आहे. याशिवाय ममता यांनी माझ्याशी मंत्रपठणाची स्पर्धा लावा असे खुले आव्हानही केले आहे. अमित शहा आणि मोदी यांच्यापेक्षा ममता यांना जास्त संस्कृत मंत्र पाठ आहेत असा दावा ममता यांनी केला आहे.