मावळ तालुका रिपब्लिकन पक्षाच्या युवक अध्यक्षपदी अमित छाजेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – देहुरोड येथील लोकनेते केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांचे खंदे व निष्ठावाण समर्थक स्वर्गीय माणिकजी छाजेड यांचे चिरंजीव अमितभाई छाजेड यांची मावळ तालुका रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

त्यांना राजगुरुनगर तालुका खेड येथे रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पँथर पंढरीनाथदादा जाधव व पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे कर्तव्यदक्ष युवक जिल्हा अध्यक्ष ऊमेशभाऊ कांबळे यांच्या शुभहस्ते नियुक्तीुपत्र देण्यात आले. या वेळी प्रदेश सचिव मा. हरेशभाई देखणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. विष्णुदादा भोसले, जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस, पारधी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, शिरुर तालुका अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सरचिटणीस कैलासजी कांबळे, उपाध्यक्ष गौतमदादा गायकवाड, कार्याध्यक्ष पोपटराव सरोदे, पुरंदर तालुका उपाध्यक्ष नामदेवराव नेटके, रिक्कु पवार, जिल्हा युवक आघाडीचे विक्रम आढाव, प्रदिप बनसोडे यांच्यासह पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सदर ठिकाणी उपस्थित होते.

अमितजी छाजेड यांनी या पुर्वी देहुरोड शहर शाखेचे अध्यक्ष म्हणुन प्रभावीपणे काम केलेले आहे. त्यांच्या पत्नी शिनाताई छाजेड या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा म्हणुन प्रभावीपणे काम करीत आहेत. अमित छाजेड यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असुन त्यांच्या निवडीने मावळ तालुक्यात नव चैतन्य निर्माण झाले असुन तरुणात आनंददायी वातावरण आहे. लोकनेते नामदार रामदासजी आठवले यांच्या नेत्रुत्वाखाली मावळ तालुक्यात सक्षमपणे काम करुन तरुणांची मोठी फळी उभारणार अशी प्रतिक्रिया निवडीनंतर अमितभाई यांनी सर्वांनसमोर व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त –