Amit Deshmukh | कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या 12116 वारसांना प्रत्येकी 50 हजारांची मदत – मंत्री अमित देशमुख

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयचे इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लातूर (Latur) जिल्ह्यातून तीन हजार ४९५ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आजपर्यंत दोन हजार ११६ मृत व्यक्तींच्या वारसांना मदत निधी देण्यात आल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण (Amit Deshmukh), सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रजासत्ताक दिनाच्या (Collector Office Republic Day) ७२ व्या वर्धापन दिनानिमत्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे (Rahul Kendra), खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shrangare), लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh), आमदार अभिमन्यु पवार (Abhimanyu Pawar), महापौर विक्रांत गोजमगुंडे ( Vikrant Gojamgunde), माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel), उपमहापौर चंद्रकांत बिराजदार (Chandrakant Birajdar), उपाध्यक्षा तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य समिती सभापती भारतबाई सोळंके (Bharatbai Solanke), महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड (Jyoti Rathod), समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे (Rohidas Waghmare), जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.(Prithviraj B. P.), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल (Abhinav Goyal), जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (Nikhil Pingale), मनपा आयुक्त अमन मित्तल (Aman Mittal), अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे (Arvind Lokhande), उपजिल्हाधिकारी ( सामान्य) गणेश महाडिक (Ganesh Mahadik), उपविभागीय अधिकारी सुनिल यादव (Sunil Yadav), तहसीलदार स्वप्नील पवार (Swapnil Pawar) आदी उपस्थित होते.

 

अमित देशमुख (Amit Deshmukh) म्हणाले, कोरोनामुळे अनाथ झालेल्या आठ बालकांना पंतप्रधान सहाय्यता योजनेतंर्गत १० लाख रुपयांची मुदत ठेव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट ऑफिस खात्यावर तर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतंर्गत ५ लाख मुदत ठेव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (Women and Child Development Officer) यांच्या संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर एक पालक गमावलेल्या ३५९ अनाथ बालकांना प्रति महिना अकराशे नुसार आतापर्यंत १९ लाख ५७ हजार इतके बाल संगोपन योजनेतंर्गत (Child Care Scheme) अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
शाळेची शुल्क माफीबाबतचा ३६ विद्यार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केला होता.
त्यापैकी १० बालांची शुल्क माफ झाला आहे.

जिल्ह्यातील फळलागवडीकरीता एक हजार ३०० हेक्टर लक्षांक असून तीन हजार ८७१ हेक्टर क्षेत्रास चार हजार १४२ शेतकऱ्यांच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत एक हजार १०७ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली आहे. त्यात आंबा, सीताफळ, पेरु या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३३६. ५६ कोटी इतका निधी म्हणजे ७५ टक्के प्राप्त झाला असून आजपर्यंत ३२७. १३कोटी म्हणजे ९७ टक्के इतका पाच लाख सात हजार ४९९ बाधितांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतीच्या खात्यांची एकूण संख्या पाच लाख ६५ हजार २८१ असून त्यापैकी २ लाख ६६ हजार ३२४ खातेदारांनी खरीप हंगामात ई-पीक पाहणी ॲपद्वारे (E-Crop Survey App) पिकांची नोंद केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

मोफत संगणकीकृत डिजीटल सातबारा वाटप मोहिमेतंर्गत पाच लाख ३६ हजार १५० खातेदारांना सातबारा वाटप केलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९४.८५ टक्के मोफत सातबारा वाटप करण्यात आल्याचा उल्लेख करत अमित देशमुख म्हणाले, पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून (Department of Tourism and Culture) राज्यातील कलाकारांना कोरोना पार्श्वभूमीवर एकरकमी प्रति कलाकार रुपये पाच हजार अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार

उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
लातूर महानगरपालिकेला (Latur Municipal Corporation) स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत (Clean survey) मानांकन प्राप्त झाल्यानबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे (Mayor Vikrant Gojamgunde), मनपा आयुक्त अमन मित्तल (Municipal Commissioner Aman Mittal), सहा. आयुक्त मंजुषा गुरमे (Manjusha Gurme), महानगरपालिकचे स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे (Ramakant Pidge) यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील यादव,
कोरोना काळ व अतिवृष्टी काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांना गौरविण्यात आले.

उल्लेखनिय व गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती पदक (Presidential Medal)
मिळाल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजाजन भातलवंडे (Crime Branch Police Inspector Gajajan Bhatalwande),
उत्कृष्ट पध्दतीने गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल पोलीस स्टेशन शिवाजी नगर (Shivaji Nagar Police Station)
येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील (Assistant Inspector of Police Dayanand Patil),
२३२ प्रकरणांमध्ये समोपदेशन करून समेट घडवून संसार पूर्ववत केल्याबाबत नेमणूक: भरोसा सेल / महिला सहाय्य कक्षाचे पोलीस
उपनिरिक्षक लक्ष्मण चव्हाण (Sub-Inspector of Police Laxman Chavan,),
कोविड योध्दा म्हणून केलेल्या कामकाजाबद्दल नेमणूक: जिल्हा विशेष शाखेचे महिला पोलीस नाईक बक्कल नंबर ३३२ कल्पना जाधव (Kalpana Jadhav)
व आधुनिक बेसिक प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक नेमणूक: पोलीस मुख्यालयाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर १५१० दीपीका क्षिरसागर (Deepika Kshirsagar)
यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार आला.
कोरेाना काळात उत्कृष्ट काम केल्याबदद्ल जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. सतीश हरिदास (Dr. Satish Haridas),
औषध निर्माण अधिकारी वहिद शेख (Wahid Sheikh)
यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच लातूर जिल्हा लातूर केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोशिएशनचे अध्यक्ष सचिव,
मे. नाना गॅस इंडस्ट्रीज गचे व्यंकट फटाले (Venkat Fatale),
मे. विजय इंडस्ट्रीयल गॅसेसे प्रा. लि. चे विनोद गिल्डा (Vinod Gilda), मे. शारदा गॅसेस प्रा. लि. चे आकाश मोरगे (Aakash Morge),
औषध निरीक्षक सचिन बुगड (Sachin Bugad)
यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

Web Title : Amit Deshmukh | 50 thousand each to 12116 heirs of those who died due to corona –
Minister Amit Deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या