ज्याची साईड हिरो होण्याची लायकी नाही ते स्वत:ला हिरो समजतात : अमित देशमुख यांचा हल्लाबोल

निलंगा : पोलीसनामा ऑनलाईन – ज्यांची साईड हिरो होण्याची लायकी नाही ते स्वत:ला हिरो समजतात. निलंग्यात एकच हिरो आहेत. ते म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर असा हल्लाबोल अमित देशमुख यांनी भाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केला.

शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख अभय साळुंके यांच्यासह शिवसेना, भाजप, मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते निलंगा येथे बोलत होते. यावेळी आयोजित प्रचार सभेत राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत दिग्गजांनी कॉंंग्रेसमध्ये प्रवेश केला.

ते म्हणाले, ही सेमिफायनल आहे फायनल आणखी बाकी हे काँग्रेस मध्ये आता इन्कमिंग सुरू आहे. निलंग्यात सध्या आम्ही दोघे भाऊ …दोघे मिळून खाऊ … असं सुरू आहे आणि म्हणून परिवर्तन झालं पाहिजे. आपण आपला खासदार बदलला पाहिजे आणि आपण हा बदल कराल, आपण पुन्हा चूक करणार नाही.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड व्यंकट बेद्रे, लोकसभा उमेदवार मच्छिंद्र कामत, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, देवणी तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, आबासाहेब पाटील सेलुकर, लक्ष्मण मोरे, पंडित धुमाळ, अँड विक्रम हिप्परकर, मो इज शेख, सुनील माने, श्रीशैल उटगे, हरिराम कुलकर्णी, बिरबल देवकते, संभाजी सुळ, सतीश पाटील उपस्थित होते.