Amit Deshmukh | भाजप प्रवेशाबाबत स्पष्टचं बोलले अमित देशमुख; म्हणाले…

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाल्याचे पहायला मिळाले (Amit Deshmukh). मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. त्यात काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख यांचा समावेश आहे. मात्र यावर आता अमित देशमुखांनी (Amit Deshmukh) नुकतेच सांगली येथे आयोजीत केलेल्या सभेत भाष्य केले आहे.

सांगली येथे आयोजीत सभेत बोलताना आमदार अमित देशमुख( Amit Deshmukh) म्हणाले की, ‘ तूर्त तरी सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाचं सरकार आहे, असं मानावं लागेल. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरु होणार आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हा प्रश्न पडला आहे. पाच वर्षे चमत्कारिक राहिली. महाराष्ट्रात पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षाचं आणि आता तिसऱ्या सरकारचा कार्यकाळ सुरु आहे. चौथं सरकार कधीही येऊ शकतं.’ असे हसत हसत भाष्य यावेळी त्यांनी केले.

‘महापालिका निवडणुका कधीही होतील. सध्या आपण अस्थिर परिस्थितीला तोंड देत आहोत. संजय काका पाटील भाजपमध्ये या म्हणत आहेत. पण तुम्हीच स्वगृही परतावे. असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना संजय काका पाटील यांना दिला. तसेच, कितीही वादळे आली, कितीही वारे आली तरी लातूरचा देशमुख वाडा तो तिथेच राहणार.’ असे देखील अमित देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.

संजय पाटील निलंगेकरांनी नुकतचं बोलताना अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले होते की, ‘ भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते.
आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची कामे लपवण्यासाठी भाजपात यायचं म्हणत आहेत.
मात्र, हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही.
त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपात हवा.’ असा टोला त्यांनी अमित देशमुख यांना लगावला होता.

Web Title :- Amit Deshmukh | congress mla amit deshmukh denied bjp join in sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh | ‘…तर मग राठोडांना क्लिन चीट का दिली?’ चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

Chandrakant Patil | पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली; म्हणाले – ‘आमचा कुठलाही देव…’

Navi Mumbai ACB Trap | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यावर एसीबीकडून FIR