पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या ‘संपर्क’ मंत्रीपदाची जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असून त्यात काँग्रेसचा देखील मोठा वाटा आहे. काँग्रेसने आता राज्यात आपले संघटन मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्र्यांची विविध जिल्ह्यांच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यानुसार अहमदनगर आणि नाशिकचे संपर्कमंत्रीपद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले आहे. तर लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे परभणी, जालना आणि बीडच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना रायगड, गडचिरोली आणि यवतमाळ चे संपर्कमंत्रीपद देण्यात आले, तर उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे अकोला आणि वाशीम जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे.

तसेच हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई उपनगर तर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे बुलडाणा, गोंदिया या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे पुण्याचे संपर्कमंत्रीपद तर नंदूरबारचे पालकमंत्री के.सी. पडवी यांना धुळे, पालघरचे संपर्कमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांना पुण्याचे तर कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर बुलडाणा, गोंदिया तर हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई उपनगर तसेच वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना पुण्याचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांना पुण्याचे, नंदूरबारचे पालकमंत्री के. सी. पडवी यांना धुळे, पालघरचे संपर्कमंत्रीपद, कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.