बॉलिवूडमधून आणखी एक वाईट बातमी; Cardiac Arrest मुळे प्रसिध्द अभिनेता अमित मिस्त्रीचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता अमित मिस्त्री यांचे शुक्रवारी (दि. 23) निधन झाले. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला असून चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अमित मिस्त्री यांनी गुजराती आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांत त्यांचा अभिनय गाजला आहे. नुकतेच त्यांनी नसरुद्दिन शहा यांची मुख्य भूमिका असलेल्या बंदिश बँडिट् या वेबसिरीजमध्ये काम केले होते. त्यात अमित एका महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. अमित मुंबईत आईबरोबर राहत होते. पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला होता. अमितने क्या कहना, 99, यमला पगला दिवाना, एक 40 की लास्ट लोकल, शोर इन द सिटी, भूत पोलीस आदी चित्रपटात भूमिका साकरल्या होत्या. त्यांनी चित्रपटासोबतच थिएटरमध्ये सुद्धा काम केले आहे. तसेच त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.