अमित पांघलची ऐतिहासिक कामगिरी करत जिंकलं ‘रौप्यपदक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारतीय बॉक्सर अमित ला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या अमित पांघलने भारतासाठी रौप्यपदकाची कमाई केली. असे करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला
आहे.

अमितने याआधी २०१८ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०१८ च्याच राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदक पटकावले होते. आजच्या ५२ किलोग्रॅम वजनी गटात झालेल्या अंतिम सामन्यात त्याचा पराभव उजबेकिस्तानच्या शाखोबिदिन जोईरोव्हकडून झाला. हा सामना शाखोबिदिनने ५-० असा एकतर्फी जिंकला.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा अमित हा पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत भारताला एकदाही दोन पदके पटकावता आली नव्हती. त्याच्यासोबत स्पर्धेत असलेल्या भारताच्या मनिष कौशिकला ६३ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. कौशिकचा पराभव क्युबाच्या अव्वल मानांकित अँडी गोमेझ क्रूझ याने केला.

स्पर्धेत अमितची चमकदार कामगिरी :
अमितने आपल्या दमदार ठोशांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवले. अमितने आक्रमक खेळ करून प्रतिस्पर्ध्यांना पूर्णपणे नामोहरम केले. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तुर्कीच्या बाटूहान सिफ्टसी याच्याशी देखील त्याने लढत देत सहज विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात मात्र त्याला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

You might also like