Amit Raj Thackeray | शिवतीर्थावर नवीन पाहुण्याचं आगमन; राज ठाकरे झाले आजोबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amit Raj Thackeray | शिवतीर्थावर (Shivteerth) नवीन पाहुण्याचं आगमन झालं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) हे आजोबा- आजी झाले आहेत. शिवतीर्थावर सध्या आनंदाचं वातावरण आहे.

अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांचा 27 जानेवारी 2019 रोजी विवाह सोहळा पार पडला होता. अमित ठाकरेंवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारीही देण्यात आली आहे. आता अमित ठाकरेंवर एक वडील म्हणून आणि राज ठाकरेंवर आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे एका कॉलेजमध्ये होते. त्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. राज यांची कन्या उर्वशी (Urvashi Thackeray) आणि मिताली यांची मैत्री असल्यामुळे मिताली यांचं कृष्णकुंजवर (Krishnakunj) येणं जाणं असायचं. काही दिवसानंतर अमित आणि मिताली यांनी आपल्या नात्याबद्दल घरी माहिती दिली. त्यानंतर दोघांच्या घरच्यांनी लग्नाला होकार कळवला.

दरम्यान, अमित ठाकरे यांच्यावर महापालिक निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर
नाशिकची (Nashik) जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी नाशिकमधील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
त्याशिवाय ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतही (Dombivli) त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.

Web Title : Amit Raj Thackeray | Arrival of a new guest on Shivatirtha ! raj thackeray became a grandfather his son amit thackeray and daughter in law mitali borude blessed with baby boy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !