अभिनेता अमित साधचे धक्कादायक वक्तव्य, म्हणाला – ’16 ते 18 वर्षाच्या वयात मी 4 वेळा केला होता सुसाइडचा प्रयत्न’

मुंबई : टीव्हीतून बॉलीवुडमध्ये एंट्री घेतलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर लोकांनी मेंटल हेल्थ, आपला एकटेपणा आणि आत्महत्येसंबंधी विचार मांडण्यास सुरूवात केली, ज्यामध्ये काही कलाकारांनी असे खुलासे केले, जे ऐकून अनेकांना धक्का बसला. सलमान खानचा चित्रपट ’सुलतान’, ’काई पो छे’, ’गोल्ड’ आणि ’शकुंतला देवी’ मध्ये दिसलेला अभिनेता अमित साधने आपल्या टीनएजमध्ये एकदा नव्हे, तर चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे कोणतेही कारण नव्हते.

बॉलीवुड अ‍ॅक्टर अमित साधने इंटरव्ह्यूच्या दरम्यान हा खुलासा केला. त्याने म्हटले, ’16 ते 18 वर्षाच्या वयादरम्यान मी चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत आत्महत्येचे विचार नव्हते, परंतु बस सुसाइड करायची होती. कोणतेही प्लॅनिंग नव्हते. एक दिवस उठलो आणि सतत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागलो. देवाच्या कृपेने मला चौथ्यांदा प्रयत्न करत असताना समजले की, हा मार्ग नाही, हा शेवट नाही, नंतर सर्व काही बदलले आणि त्या दिवसानंतर मी कधीही पराभूत न होण्याचा निर्णय घेतला.

त्याने पुढे म्हटले की, एका मोठ्या अ‍ॅक्टरने माझ्या एक्स-गर्लफ्रेंडला म्हटले होते की हा वेडा आहे, यास सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा. तेव्हा मी काही म्हटले नाही, परंतु जेव्हा मी त्या अ‍ॅक्टरला दोन वर्षानंतर भेटलो, तेव्हा त्यास म्हणालो सर मी वेडा नाही. मी एकदतम ठिक आहे, असे असू शकते की मी जास्त इमोशनल आहे, किंवा माझ्यात इतर गोष्टी आहेत. मला एकटेपणा जाणवतो किंवा त्रस्त आहे, परंतु मी वेडा नाही. माझा मेंदू एकदम ठिक आहे.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे तर अमित साधचा शेवटचा चित्रपट ’शकुंतला देवी’ होता, ज्यामध्ये विद्या बालन आणि सान्या मल्होत्राची सुद्धा महत्वाची भूमिका होती. अमित साध नुकताच वेब सीरीज ‘ब्रीद’ मध्ये दिसला होता. त्याने अभिषेक बच्चन सोबत मुख्य भूमिका निभावली होती. यासोबतच तो वेब सीरीज ’ब्रीद : इंटू द शॅडो’ आणि ’अवरोध : द सीज विदीन’ मध्ये सुद्धा दिसला होता.

You might also like