कलम 370 ! वेळप्रसंगी ‘जीव’ गेला तरी ‘बेहत्‍तर’ : अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू काश्मिरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कलम ३७० मधील काही तरतुदी शिथिल केल्या आहेत. तसंच जम्मू-काश्मिर आणि लडाख यांचे विभाजनही करण्यात आले आहे. या निर्णयावर आज लोकसभेत रणकंदन माजले आहे. कारण जम्मू-काश्मिरच्या निर्णयावर अनेकांनी होकार दिला असून विरोधकांनी मात्र गोंधळ घालत या निर्णयावर नकार देत आहेत. त्यावर लोकसभेत आक्रमक होत जम्मू काश्मिरच्या प्रश्नावर वेळ प्रसंगी प्राणांची आहुती देऊ असं वक्तव्य केले आहे.

सोमवारी राज्यसभेत कलम ३७० हटविण्याबाबत अमित शहांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर तो पारितही करण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप आणि मायावतींचा पक्ष बसपा यांनी पाठिंबा दिला आहे. तर आज लोकसभेत या विधेयकावर चर्चा होत असतानाच त्याला विरोध करणाऱ्या नेत्यांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र अमित शहा यांनी आक्रमक होत विरोध करणाऱ्यांना थेट इशाराच दिला. वेळप्रसंगी काश्मिर प्रश्नासाठी आम्ही जीव देऊ अशी आक्रमक भूमिका घेतली. तसंच येत्या ५ वर्षांत काश्मीरचे नंदनवन करणार असल्याची ग्वाही अमित शाह यांनी लोकसभेत दिली आहे.

दरम्यान, कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू आणि काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा दिला जाणार आहे. तसंच जम्मू काश्मिरचे विभाजन करत केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर लडाखलाही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –