Amit Shah | अमित शहा 26 तारखेला पुण्यात ! शरद पवार अध्यक्ष असलेल्या VSI च्या भेटीचा दौऱ्यात समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या (Maharashtra) दौऱ्यावर येत आहे. सहकार मंत्री झाल्यानंतर अमित शहा (Amit Shah) पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. ते पुण्यातील (Pune) वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेला भेट देणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) भेटीचा या दौऱ्यात समावेश आहे.

 

अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याने दौऱ्याची तयारी करण्यासाठी 16 नोव्हेंबरला केंद्रीय सहकार विभागाची टीम पुण्यात येणार आहे.
वैकुंठभाई मेहता संस्था आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊन दौऱ्याच्या तयारीची माहिती घेणार आहेत.
या दोन संस्थेशिवाय सहकारात काम करणाऱ्या इतर व्यक्तींची अमित शहा भेट घेण्याची शक्यता आहे.
परंतु त्यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळात शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आले.
त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी केंद्रात सहकार खाते स्थापन करण्यात आल्यानंतर पहिले सहकार मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.
सहकार चळवळ प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरात (Gujarat) या दोन राज्या जास्त प्रमाणात आहे.
अमित शहा स्वत: अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अनेक वर्षे अध्यक्ष होते.
सहकार खात्यात त्यांनी काम केल्याने या खात्याची जबाबदरी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आल्यानंतर राज्यातील सहकार चळवळीत केंद्राचा हस्तक्षेप वाढणार यावरुन बरीच चर्चा झाली.
सहकार हा राज्याचा विषय असल्याने केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करु नये असे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा महाराष्ट्राचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

 

Web Title : Amit Shah | Amit Shah in Pune on 26th! Visit of VSI chaired by Sharad Pawar included in the tour

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,016 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Crime News | आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या भावात कमालीची वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर