मोदी सरकारच्या कॅबिनेट कमिटीची स्थापना ; ‘या’ मंत्र्यांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच मोदी सरकारचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर आता मोदी सरकारने सुरक्षेतेच्या मुद्द्यासांठी ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ (CCS) ची स्थापना केली आहे. या कमिटीत गृहमंत्री अमित शाह आणि एस. जयशंकर यांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. नव्या कॅबिनेट कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

मोदी सरकार १ मध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचा समावेश होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली नाही तसेच मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. या कमिटीत राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन यांचा समावेश आधीपासून होता. या कमिटीत अमित शाह आणि एस. जयशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी-
केंद्र सरकारचे महत्वाचे मंत्री या कमिटीमध्ये घेतले जातात. ही कमिटी सर्वात पॉवरफुल मानली जाते. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ देशातील सुरक्षेतेसंदर्भातील सर्व निर्णय ही कमिटी घेते. पंतप्रधानांव्यतिरिक्त गृहमंत्री, संरक्षणमंत्री, विदेश मंत्री, अर्थमंत्री यांचा समावेश असतो. ही कमिटी राजनैतिक , देशाच्या सुरक्षेविषयी, शस्त्रे, करार, शस्त्रे खरेदी -विक्री संदर्भात निर्णय घेते.