‘HM अमित शाह यांच्या सोबतची भेट राजकीय नाही, ठाकरे सरकार पाडण्यात रस नाही’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही. आता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास त्यांनाही महाराष्ट्रातील परिस्थिती सांगणार आहे. सध्या राज्यात काय चाललं आहे, काय झालं पाहिजे यावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर बोलताना फडणवीस यांनी ही राजकीय भेट नसल्याचे सांगितले.
Met Hon Union Home Minister @AmitShah ji in New Delhi along with our leaders from Maharashtra to demand a package for sugar industry.
We placed various demands like MSP, restructuring of loans, soft loan for sugar industry, on which Hon HM assured a positive consideration. pic.twitter.com/mE5lcOMMNu— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 17, 2020
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. हे सरकार तीन पक्षांच्या अंतर्विरोधाने कोसळणार आहे. जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा काय करायचं ते पाहू. आज मी अमित शाह यांना भेटलो यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. कोरोनाची महाराष्ट्रातील स्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या दोन गोष्टीं बाबत मी त्यांच्याशी बोललो, अस त्यांनी सांगितले.