’तो हो जाए दो-दो हाथ’, HM अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पूर्व लद्दाखमधील गलवान खोर्‍यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात 20 भारतीय जवान शहिद झाले. यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर खोचक टीका केली. अनेक आरोपही केले. काँग्रेसच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एवढंच नाही तर काँग्रेसवर हल्लाबोलही केला.

अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत दोन्ही युद्ध जिंकण्याच्या उबंरठ्यावर आहे. भारत कोरोनासोबतच लद्दाखमध्ये नियंत्रण रेषेवर सुरु झालेल्या तनावाचा एकाच वेळी संघर्ष करत आहे. सरकर प्रत्येक मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. संसद सुरू राहणार आहे. ज्यांना कोणाला भारत-चीन सीमावादावर चर्चा करण्यासाठी यायचे आहे, त्याने खुशाल यावे. आम्ही चर्चा करण्यात तयार आहे. 1962 पासून आजपर्यंत दोन-दोन हात करण्यासही आम्ही सज्ज आहे, असा शब्दात शाह यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.

सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास घाबरत नाही. मात्र, देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत आहे आणि सरकार त्याबाबत ठोस भूमिका घेत असताना असे कोणतेही वक्तव्य करू नये, जेणे करून त्यामुळे पाकिस्तान आणि चीनला आणखी पाठबळ मिळेल, असेही शाह यांनी यावेळी सांगितले.मुंबई पाठोपाठ आता देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचा खुलासा केला. मनीष सिसोदिया म्हणाले होते, की, दिल्ली 31 जुलैपर्यत कोरोना रुग्णांची संख्या 5.5 लाखांवर पोहोचेल. यामुळे दिल्लीकर मोठ्या दहशतीत वावरत आहे.