55 वर्षाचे झाले अमित शहा, असा राहिला शेअर ब्रोकर पासुन राजकारणातील ‘बादशाह’ पर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज 55 वा वाढदिवस. 22 ऑक्टोबर 1964 रोजी अमित शहा यांचा जन्म मुबईतमध्ये एका चांगल्या गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कुसुमबेन आणि वडिलांचे नाव अनिलचंद्र शहा आहे. सध्या सुरु असलेल्या राजकारणातील चाणक्य अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. शेअर ब्रोकर ते राजकारणातील बादशहा असा अमित शहा यांचा प्रवास राहिलेला आहे.

अहमदाबाद मधील कॉलेजात बॉयोकेमिस्ट्रीमध्ये बीएससी केल्यानंतर अमित शहा यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर अमित शहा यांनी शेअर बाजारात पाऊल ठेवले आणि ते मोठे स्टॉक ब्रोकर झाले. त्यानंतर सुरु झालेल्या राजकीय प्रवासासनंतर त्यांनी कधी मग वळूनच पाहिले नाही.

 

16 वर्षाचे असतानाच स्वयंसेवक झाले होते अमित शहा
1980 मध्ये 16 वर्षाचे असतानाच ऐट शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आपला प्रवेश केला होता आणि ते अखिल विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते झाले होते. दोनच वर्षात आपल्या कामांमुळे अमित शहा गुजरातमधील एबीव्हीपीचे संयुक्त सचिव बनले.1986 मध्ये अमित शहा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली होती आणि तेव्हापासून ते मित्र आहेत.

राम मंदिर आंदोलन आणि आडवाणींशी भेट
1987 मध्ये अमित शहा भाजपच्या जनता युवा मोर्च्यात सामील झाले आणि सक्रिय राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर शहा यांना BJYM चा राष्ट्रीय खजिनदार केले गेले. 1989 मध्ये अहमदाबाद शहराचे सचिव झाले.

राम मंदिराच्या आंदोलनादरम्यान अमित शहा यांनी प्रचार प्रसाराची धुरा योग्य पद्धतीने सांभाळली आणि शहा यांची भेट लालकृष्ण अडवाणी यांच्याशी झाली. त्यावेळी अडवाणी हे गांधीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवत होते. त्यावेळेस पासून ते 2009 पर्यंत अमित शहा यांनी अडवाणींच्या प्रचार नियोजनाची जबाबदारी पार पाडली.

Amit shah official portrait.jpg

शहा यांनी गुजरात प्रदेशला आर्थिक संकटातून वाचवले
1995 मध्ये शहा गुजरातच्या वित्त निगमचे अध्यक्ष बनले. आपल्या कामातून शहा यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या वित्त निगमाला 214 % वाढ मिळवून दिली. गुजरात वित्त निगम लहान उद्योगांना टर्म लोन आणि लागणारे भांडवल देऊन विकासाला चालना देणारे एक महत्वाचे ठिकाण होते.

अमित शहा वयाच्या 36 अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे सगळ्यात युवा अध्यक्ष झाले होते. त्यानंतर बँकेने पहिल्याच वर्षात 20.28 कोटींचा तोटा कव्हर करून 6.60 कोटी नफा कमवला होता.

पहिल्यांदा आमदार झाले अमित शहा
1997 मध्ये शहा यांनी सरखेज मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकण्याचे मताधिक्य वाढतच गेले.

 

भाजपात कसे मोठे झाले शहा ?
1998 मध्ये अमित शहा यांचे संघठन कौशल्य पाहून त्यांना पहिल्यांदा गुजरात प्रदेशाचे प्रदेश सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर लगेच शहा यांना गुजरात प्रदेशाचे उपाध्यक्ष देखील करण्यात आले.

2001 मध्ये अमित शहा यांना भाजपच्या राष्ट्रीय सहकाराच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर अमित शहा यांना सहकार क्षेत्रातील पितामह अशी उपाधी दिली गेली.

2002 मध्ये गुजरात सरकारमध्ये मंत्री झाले अमित शहा
2002 मध्ये अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री झाले त्यासोबतच त्यांनी अनेक महत्वाच्या खात्यांचा पदभार स्वीकारला आणि अनेक विभागात चांगली कामगिरी केली. 2006 मध्ये अमित शहा गुजरात चेस संघाचे अध्यक्ष झाले आणि त्या वेळी पहिल्यांदा गुजरातमध्ये बुद्धिबळाच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानंतर 2009 मध्ये अहमदाबाद सेन्ट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट एसोसिएशनचे अध्यक्ष आणि गुजरात क्रिकेट एसोसिएशनचे उपाध्यक्ष झाले.

खोटा एनकाऊंटर केस आणि जेलमध्ये गेले अमित शहा
अमित शहा यांच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील आल्या. 2010 मध्ये खोट्या एनकाउंटरच्या आरोपावरून अमित शहा यांना जेलमध्ये जावे लागले. त्यानंतर 2015 मध्ये यातून अमित शहा यांची निर्दोष मुक्तता झाली.

Image result for जेलमध्ये गेले अमित शहा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री बनले अमित शहा
अमित शहा यांना 2014 मध्ये उत्तर प्रदेशच्या लोकसभेचे नेतृत्व देण्यात आले होते यावेळी भाजपला उत्तर प्रदेशात मोठे यश मिळाले. त्यानंतर जुलै 2014 मध्ये अमित शहा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले. 2016 मध्ये देखील पक्षाने त्यांचे हे पद कायम ठेवले. दुसऱ्यांदा ज्यावेळी केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले त्यावेळी अमित शहा देशाचे गृहमंत्री झाले. यानंतर त्यांनी कलम 370 रद्द करण्यासारखे अनेक धाडसी निर्णय घेतले.

 

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like