Amit Shah | ‘मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, पण…’ – अमित शाह (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोदी सरकारचे (Modi government) काही निर्णय चुकीचे असू शकतील, परंतु त्यामागे असणारी सरकारची भावना मात्र स्वच्छ होती असं त्यांनी म्हटलं आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) 94 व्या वार्षिक संमेलनात अमित शाह (Amit Shah) बोलत होते. देशातील 130 कोटी लोकांचा लोकशाहीवरील (Democracy) विश्वास अजून वाढला आहे हेच मोदी सरकारचं सर्वात मोठं यश असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. देशाच्या विकासात (development) फिक्कीचं योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

 

अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकतं. पण भावना मात्र चुकीची नव्हती. आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य करतात असेही त्यांनी यावेळी म्हटले. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप (Corruption allegation) लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा (Improvement) करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अमित शहा पुढे म्हणाले, कोरोना (Corona) संकटादरम्यान सरकारने असे अनेक निर्णय घेतले ज्याचा फायदा पुढील बऱ्याच काळापर्यंत होईल. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकी झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीड वर्षाहून अधिक काळ 80 कोटी लोकांना प्रती व्यक्ती/दर महिना मोफत अन्न (Free food) देण्याचं काम भाजपच्या (BJP) मोदी सरकारने केले आहे. हे खूप मोठे काम असून, जगात कोणीही असं केलेलं नाही. भारताची अर्थव्यवस्था (Economy) वेगाने आपल्या मार्गावर येत असल्याचे शाह यांनी सांगितले.

 

FICCI चं कौतुक करताना अमित शाह म्हणाले, 1972 पासून आजपर्यंत देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान आहे.
आता ते योगदान अनेक टक्क्यांनी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे आणि इतर क्षेत्रांचाही विचार करावा ही वेळ आली आहे.
फिक्कीसारख्या संघटना पुढे आल्या तरच आत्मनिर्भर भारताचं ध्येय पूर्ण होऊ शकते.

 

 

 

Web Title :- Amit Shah | BJP leader and Union home minister amit shah narendra modi government ficci

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Brahmastra Motion Poster | ‘ब्रम्हास्त्र’च्या मोशन पोस्टर लॉंन्च वेळी रणबीर कपूरनं केलं आलिया भट्टला अपमानित…

Pune News | भाजपने संपूर्ण शहरात लावलेल्या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सत्ताधारी BJP ने लावले नाहीत – राष्ट्रवादी काँग्रेस