HM अमित शाहांनी काश्मीरच्या समस्येला पं. जवाहरलाल नेहरूंना ‘जबाबदार’ ठरवलं, काँग्रेसचा संसदेत ‘गदारोळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर लोकसभेत जोरदार टीका केली. अमित शहा यांनी जवाहरलाल नेहरू यांच्यावर थेट टीका करताना म्हटले की, नेहरूंनी काश्मीरचा एक भाग पाकिस्तानला देऊन टाकला. देशाचे विभाजन केले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांचे मत देखील विचारात घेतले नाही. नेहरूंनी केलेली चूक देश भोगतोय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शुक्रवारी लोकसभेत जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक सादर केले. त्यांनी पहिल्यांदा जम्मू काश्मीर मधील राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. या वेळी बोलताना त्यांनी नेहरूंवर आणि काँग्रेसवर निशाणा साधला. अमित शहांनी म्हटले की, काश्मीरमधील दहशतवाद्याच्या समस्याला काँग्रेस आणि नेहरू जबाबदार आहेत.

अमित शहा म्हणाले की, आज काँग्रेसचे नेते मनीष तिवारी देशाच्या विभाजनावर प्रश्न उपस्थितीत करत आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की, देशाची विभागणी कोणी केली होती? आज काश्मीरचा एक तृतीयवंश भाग भारताकडे नाही आहे. हे कोणामुळे झाले? जमाते इस्लामी संघटनेवर का बंदी घालण्यात आली नाही? असे प्रश्न उपस्थित करून अमित शहांनी नेहरू आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ व्यायाम करा

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आलियाच्या ‘बोल्ड’ फोटोंनी पाण्यात लावली ‘आग’